शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
3
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
4
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
5
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
6
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
7
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
8
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
10
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
11
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
12
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
13
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
14
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
15
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
16
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
17
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
18
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
19
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
20
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य अभिवाचनात कोल्हापूरचे ‘धाकटे आकाश’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:06 IST

रंगगंध कलासक्त न्यास आयोजित अखिल भारतीय साहित्य अभिवाचन महोत्सवात कोल्हापूरच्या सर्जन शाळा संघाच्या ‘धाकटे आकाश’ने पहिल्या क्रमांकावर मोहोर कोरली. द्वितीय पुणे, तर नाशिकला तृतीय क्रमांक मिळाला. वैयक्तिक दिग्दर्शन व अभिनयाची पारितोषिकेही देण्यात आली.

ठळक मुद्देद्वितीय पुणे, तर नाशिकला तृतीय क्रमांकराज्यातील २८ संघांनी घेतला होता सहभागसर्वोत्कृष्ट बृहन्महाराष्ट्र पारितोषिक उज्जेनच्या स्वर संवाद संस्थेने पटकावलेचाळीसगाव येथे रंगगंध कलासक्त न्यासचे आयोजन

चाळीसगाव, जि.जळगाव : रंगगंध कलासक्त न्यास आयोजित अखिल भारतीय साहित्य अभिवाचन महोत्सवात कोल्हापूरच्या सर्जन शाळा संघाच्या ‘धाकटे आकाश’ने पहिल्या क्रमांकावर मोहोर कोरली. द्वितीय पुणे, तर नाशिकला तृतीय क्रमांक मिळाला. वैयक्तिक दिग्दर्शन व अभिनयाची पारितोषिकेही देण्यात आली. रविवारी सायंकाळी महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात बक्षीस वितरण झाले.गेल्या १६ वर्षांपासून रंगगंधतर्फे अ.भा.स्तरावर मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदाचे हे १७ वे वर्ष असून एकूण २८ संघांनी सहभाग नोंदवला. राज्यातील २१ केंद्रांवर प्राथमिक फेरी पार पडली. शुक्रवारी अभिवाचन महोत्सवाचे उद्घाटन आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झाले.रविवारी सायंकाळी मुंबई येथील ज्येष्ठ रंगकर्मी गिरीष पतके यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, प्रमोद लिमये, नरेंद्र आमले, मीनाक्षी निकम, अश्विनी पाटील, प्रकाश कुलकर्णी, विश्वास देशपांडे, उमाकांत ठाकुर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रंगगंधचे अध्यक्ष डॉ.मुकुंद करंबेळकर यांनी केले. सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले.अभिवाचन विजेते असे :प्रथम सर्जन शाळा, धाकटे आकाश (कोल्हापूर), द्वितीय महाराष्ट्र कल्चरल सेंटर, आपली कथा आपणच लिहावी (पुणे), तृतीय अक्षरायन, भगव्या वाटा (नाशिक), उत्तेजनार्थ प्रथम विजीगीषा फाऊंडेशन, अमिबा आणि स्टील ग्लास (मुंबई), उत्तेजनार्थ द्वितीय चक्री, पाच तीन दोन मनोरंजन (मुंबई)वैयक्तिक दिग्दर्शन विजेते : शंतनू पाटील- धाकटे आकाश (प्रथम), द्वितीय- प्रमोद काळे आपली कथा आपणच लिहावी (द्वितीय), अर्पणा क्षेमकल्याणी - भगव्या वाटा (तृतीय)वैयक्तिक अभिनय विजेते : शंतनू पाटील- प्रथम, वेदांत रानडे- द्वितीय, पल्लवी पटर्वधन- तृतीय, शिवराम धनवडे- उत्तेजनार्थ प्रथम, सुचित्रा पंडित - उत्तेजनार्थ दुसरे, प्रीतेश मांजलकर- उत्तेजनार्थ तिसरे, मोहन गोगारे - उत्तेजनार्थ चौथे, विवेक कविश्वर- उत्तेजनार्थ पाचवे. सर्वोत्कृष्ट संहिता लेखन पाच तीन दोन मनोरंजन, समीक्षक गटात सामंत विद्यालय (चाळीसगाव) तर सर्वोत्कृष्ट बृहन्महाराष्ट्र पारितोषिक उज्जेनच्या स्वर संवाद संस्थेने पटकावले.