शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषकाचे अंतिम विजेतेपद कोल्हापूरने पटकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2023 19:16 IST

नागपूर उपविजेता, पुणे विभाग तृतीय क्रमांक, उत्कृष्ट खेळाडू विकास, अनिमेष, तनवीर

भूषण श्रीखंडे

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे १७ वर्षांतील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेचा समारोप रविवारी झाला. स्पर्धेचा अंतिम सामना कोल्हापूर विरुद्ध नागपूर यांच्यात खेळला गेला. कोल्हापूर विभागाने नागपूरचा ५-० ने असा दणदणीत पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. तृतीय स्थानासाठी नाशिक विरुद्ध पुणे यांच्यात झालेला सामना पुणे संघाने १-० ने जिंकला.

राज्यस्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला कोल्हापूरचे सौरभ भोसले, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. केतकी पाटील, ज्ञानदेव महाडिक, जफर शेख, प्रदीप तळवलकर, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख, कार्याध्यक्ष अनिता कोल्हे, सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक ताहेर शेख, आमिर शेख, मनोज सुरवाडे, भास्कर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन फारुक शेख यांनी केले. आभार जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांनी केले.

विजेत्यांना चषक, पदक देऊन गौरवया फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूचा मान नागपूरचा गोलकीपर अनिमेश सोरेन, सर्वाेकृष्ट खेळाडू म्हणून कोल्हापूरचा तनवीर अहमद याला गौरविण्यात आले. अंतिम स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून नागपूरचा विकास निगथोजन यांना पारितोषिक देण्यात आले. विजय, उपविजय संघांना चषक व तसेच स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना पदक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.