शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत केला चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल येथे घडली. पती हारून मुस्तफा खान (रा. गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध पत्नीच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी आफ्रिनबी हारून खान या गेंदालाल मिल येथे पती, सासू व तीन मुलांसह वास्तव्यास आहेत. पती हारून हा मालवाहतूक चारचाकी वाहनावर चालक म्हणून काम करताे. दरम्यान, सासू ईदनिमित्त नातेवाइकांना भेटण्यास गेली होती तर मुलेदेखील बाहेर गेली होती. त्यामुळे पती-पत्नी दोघे घरी होते. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता पती हारून याने पत्नीकडे दाढी करण्यासाठी पैसे मागितले व नंतर दाढी करण्यासाठी घराबाहेर गेले. काही वेळानंतर ते दाढी न करता घरी परतले. व पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

स्वयंपाकघरातून चाकू आणून केला वार

हारून हा रागाच्या भरात स्वयंपाकघरात गेला. तेथून भाजी कापण्याचा चाकू आणून त्याने पत्नीच्या मनगटावर, छाती तसेच पोटाच्या मध्यभागी वार केला. नंतर मारहाण केली. चाकूच्या हल्ल्यामुळे मनगटातून रक्त निघत असल्याचे पाहून आफ्रिन यांनी आरडाओरड केली असता, गल्लीतील रहिवाशांनी खान यांच्या घराकडे धाव घेत भांडण सोडविले. जखमी आफ्रिन यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. या प्रकरणी पती हारून याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.