शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकीण ते स्वत:ची खाणावळ

By admin | Updated: May 14, 2017 19:27 IST

पाचोरा येथील मंगल मधुकर कुलकर्णी यांची संघर्ष कहाणीही रोचक आहे.

ऑनलाइन लोकमतपाचोरा, जि. जळगाव, दि. 14 - स्वयंपाकीणपासून कष्ट करीत स्वत: खाणावळ मालक बनलेल्या पाचोरा येथील मंगल मधुकर कुलकर्णी यांची संघर्ष कहाणीही रोचक आहे. मातृदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेतला असता समजले की, या उंचीवर पोहोचण्यासाठी याआधी त्यांनी संघर्ष केला. त्यांचे पती मधुकर दत्तात्रय कुलकर्णी केवळ 300 रुपयांच्या पगारावर एका खासगी कंपनीत कार्यरत होते. पदरी चार मुलं होती. कुटुंबाला सावरण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी मंगल कुळकर्णी यांनी घराबाहेर पाऊल टाकत स्वाभिमानानं काही ठिकाणी स्वयंपाक करण्याचं काम स्वीकारलं. हाताला अन्नपूर्णेचं वरदान लाभलं होतं. दोन घरं वाढली. पापड लाटण्याचं  कामसुद्धा त्यांनी स्वीकारलं. घराला मदत होत होती, पण पुन्हा अडचणी समोर उभ्या करून नियती जणू त्यांची परीक्षा घेत होती. त्यांच्या मुलाला योगेशला वयाच्या पंधराव्या वर्षी अपंगत्व आलं. पतीचं आजारपण, ऑपरेशन अशा अनेक समस्या समोर आल्या. पण मंगलाताईंनी न डगमगता त्यांना सामोरे जाणे पसंत केलं. पती पूर्ण बरे झाले तर मुलगा आपल्या पायांवर उभा राहू शकेल एवढा सक्षम झाला, आणि 1982 मध्ये दोन मेंबर्स असलेलं पाचोरा शहरातील पहिलं घरगुती भोजनालय सुरू झालं पण या क्षेत्रात आपण पूर्ण यशस्वी होऊ हा आत्मविश्वास मंगलाताईंना होता आणि त्याच्याच बळावर त्यांनी आपल्या चारही मुलांची शिक्षणं पूर्ण केली. आज त्यांचा मोठा मुलगा बँकेत मोठय़ा पदावर  कार्य करतोय तर तीन मुलं त्यांचा भोजनालयाचा व्यवसाय सांभाळताय. आज या भोजनालयाच्या शहरात दोन शाखा निर्माण झाल्या आहेत. आज चारही मुलांची लगAं झाली आहेत. सुना आणि नातवंडांसह 16 जणांचा परिवार आहे. या भोजनालयात भोजनासाठी येणा:या प्रत्येक सदस्याला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानणा:या मंगलाताईंना पूर्वीचा संघर्ष आठवला की आजही गहिवरून येतं.