ऑनलाईन लोकमत
यावल, दि.1 - शेतमालाला हमी भावासह सातबारा कोरा झालाचं पाहिजे अशा घोषणा देत ब:हाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील तालुक्यातील किनगाव येथे शेतक:यांनी गुरुवारी आंदोलन करत सुमारे एक महामार्गा रोखला़
शेतक:यांनी शेतमाल बाजारपेठेस न नेण्याचा निर्णय घेतला़ परिसरातील सर्व शेतक:यांनी याची अंमलबजावणी करावी या करीता किसान क्रांती कृती समितीच्या वतीने प्रय} सुरू झाल़े शेतकरी संपाच्या पहिल्याचं दिवशी किनगाव बाजारपेठ बंद ठेवत जिल्ह्यावर जाणारा भाजीपालासह इतर शेती उत्पादन गावाबाहेर जावू देण्यात आला नाही. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी पथकासह दाखल होत 55 आंदोलनकत्र्याना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली़ या आंदोलनात शेतकरी संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख कडूअप्पा पाटील, पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील, चंद्रकांत चौधरी, राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य शुक्राम अण्णा पाटील, कैलास वराडे, बापू महाजन, प्रमोद पाटील, जगन्नाथ पाटील सहभागी झाल़े