जळगाव : जिल्ह्यात सध्या खरीप पेरणी ९३ टक्के पूर्ण करण्यात आली आहे. यंदा ७ लाख ९ हजार ५६४ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. भुसावळ आणि बोदवड या दोन तालुक्यात पूर्ण १०० टक्के पेरणी झाली आहे. तर सर्वात कमी पेरणी पाचोरा तालुक्यात ८२ टक्के आणि यावल तालुक्यात ८८ टक्के झाली आहे. जिल्हा कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार यंदा जिल्ह्यात कापसाची पेरणी जास्त झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ५ लाख २२ हजार ९९४ हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे. तर सोयाबीन ५९ टक्के, भुईमूग ५८ टक्के पेरणी झाली आहे. तर बाजरी ४६ टक्के आणि ज्वारीची पेरणी ५९ टक्केवर झाली आहे.
जिल्ह्यात खरीप पेरणी ९३ टक्के पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST