शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खरीप हंगाम शेवटपर्यंत तहानलेलाच

By ram.jadhav | Updated: September 19, 2017 23:24 IST

कर्जबाजारी शेतकरी अजूनच आर्थिक संकटात सापडला गेला़ मात्र त्याचे सोयरसुतक कुणालाही नाही़

ठळक मुद्देपावसाअभावी पिकांची वाढ खुंटलीकिडींचाही प्रादुर्भाव वाढलाउत्पादनावर होणार परिणाम

राम जाधवआॅनलाईन लोकमत, जळगाव, दि़ १९ -शेतकºयांनी नेहमीप्रमाणेच अपेक्षा ठेवून मोठ्या आशेने खरिपाच्या हंगामाची लागवड केली़ परंतु सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात दुबार तर काही ठिकाणी तिसºयांदा पेरणी करावी लागली़ त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी अजूनच आर्थिक संकटात सापडला गेला़ मात्र त्याचे सोयरसुतक कुणालाही नाही़या हंगामातील खरीप पिकांची परिस्थिती फारसी काही चांगली नाही़ त्यामुळे या वर्षीच्या खरीप हंगामाचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त घटणार आहे, यात शंका नाही़ पावसाने पाठ फिरवल्याने सर्वच पिके सलाईनवर जगत आलेले आहेत़ त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा बळीराजाचा ‘बळी’ जात आहे, हे निश्चित़आता परतीचा पाऊस जरी काही भागात पडत असला, तरी मध्यंतरीच्या मोठ्या खंडामुळे पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे़ तग धरलेल्या पिकांना मात्र या पावसाचा शवेटी काहीतरी फायदा होईल़मक्याचे उत्पादन कमीचमका पिकाच्या ऐन वाढीच्या काळात व दाणे भरण्याच्या वेळी पाण्याचा ताण पडल्याने दाणे अपूर्ण भरले आहे़ त्यामुळे कणसाचा आकार लहान राहिला आहे़ तसेच खोड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट येणार आहे़ या पिकावर मावा व कणसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव झालेला आहे़आला तो नुकसान करून गेलागेल्या आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात व जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरात जवळपास सात ते आठ गावांमध्ये वादळी वाºयासह झालेल्या मुसळधार पावसाने मक्याचे उभे पीक आडवे झाले आहे़ तर याच भागातील कपाशी, ऊस या पिकांसह खरिपाच्या सर्वच पिकांचे वादळी पावसात नुकसान झाले आहे़ त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला गेला व लावलेला खर्चही गेला़ अशाप्रकारे तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीनसह जवळपास सर्वच पिकांची या हंगामात बिकट स्थिती आहे़उडीद व मुगाचे उत्पादन कमीचउडीद व मुगावर रसशोषक किडी, पाने खाणारी अळी व पिवळा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होता़ त्यातच शेंगा आलेल्या असताना पावसाने रिपरिप लावली, त्यामुळे आलेल्या शेंगा खराब झाल्या़ नंतर पुन्हा पावसाची गरज असताना मात्र पावसाने उघडीप दिली़ यामुळे यावर्षी उडीद व मुगाचे सरासरीपेक्षा ३० ते ४० टक्क्यांपर्यंत उत्पन्न घटले आहे़ त्यातच आहे, त्याही मालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत़काही भागात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात खरिपाची पेरणी झाली़ तर काही भागात पाऊसमान व नैसर्गिक स्थितीही चांगली नसल्याने काही शेतकºयांनी पेरणी करण्यापेक्षा जमिनी पडीत ठेवल्याचीही स्थिती जामनेर तालुक्यात आहे़हंगामाच्या सुरुवातीला लागवड केल्यानंतर पावसाची अनियमितता असल्याने पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम झाला़ मात्र मध्यंतरी आॅगस्टमध्ये रिमझिम बरसलेल्या श्रावणधारांमुळे काही भागात पिकांना जीवदान मिळाले़ पुन्हा आॅगस्टच्या शेवटी पावसाने हुलकावणी दिली़ त्यामुळे ऐन दाणे भरण्याच्या व फुले पात्या बनण्याच्या काळात पिकांना पाण्याचा झटका बसल्यामुळे उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे़कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव जास्तजेव्हा पावसाने उघडीप दिली, त्या काळात कपाशीवर मोठ्या प्रमाणावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला़ यामध्ये मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पिठ्या ढेकूण (मिली बग), पांढरी माशी तर काही भागात गुलाबी बोंडअळीसह पाने खाणाºया अळींचाही प्रादुर्भाव आढळून आला़ यामुळे कपाशीच्या पिकावर याचा परिणाम होऊन कपाशीचे उत्पादन घटणारगिरणा परिसरात कपाशीचे पीक पाण्याअभावी करपून जात आहे़ हलक्या जमिनीवरील पीक तर अक्षरश: वायाच गेले आहे़ भारी जमिनीवरील कपाशी कशीबशी तग धरून आहे. मात्र तिच्याही उत्पन्नावर परिणाम होत आहे़ जिल्ह्यात पाऊस अनियमित व अनिश्चित आहे़ नुकत्याच केलेल्या नजर अंदाजानुसार खरीप हंगामातील सर्व पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे़ त्यामुळे या हंगामात शेतकºयांचे उत्पन्न घटणार आहे़ पिकांच्या ऐन जोमाच्या काळात पावसाने उघडीप दिल्याने उत्पन्न घटण्याचा अंदाज आहे़- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव़यावर्षी मोठ्या अपेक्षेने खर्च करून पिकांची लागवड केली होती़ मात्र निसर्गाने सर्व अपेक्षांवर पाणी फेरले़ सरतेशेवटी आलेल्या वादळी पावसाने होते नव्हते, ते सर्व पुन्हा वाया गेले़- प्रकाशचंद जैन, शेतकरी, माजी सरपंच वाकोद