शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

खापरखेड्याचा वाळू ठेका अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:31 IST

अपर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

ठळक मुद्दे राष्टÑवादी महानगराध्यक्षांविरूद्ध दाखल झाला आहे गुन्हा मालेगाव तहसील कार्यालयातून पळविले होते जप्त ट्रक ७४ लाख ३३ हजाराच्या वसुलीचे आदेश

जळगाव : कागदोपत्री ठेका नावावर नसताना बळजबरीने अमळनेर तालुक्यातील खापरखेडा वाळू गटात भागीदार झालेल्या राष्टÑवादी महानगराध्यक्षांचा उद्दामपणा मूळ मक्तेदारालही नडला असून मालेगाव विभागाचे अपर जिल्हाधिकाºयांच्या अहवालावरून झालेल्या मोजणीनंतर खापरखेडा वाळू ठेका अखेर रद्द करण्याचा, आदेश जळगावच्या अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिला आहे.खापरखेडा येथील वाळू ठेका भगवती बिल्डींग मटेरियल सप्लायर्स अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट तर्फे नाशिक येथील रमेश कटाळे यांनी घेतला आहे. मात्र राष्टÑवादीचे जळगाव महानगराध्यक्ष निलेश पाटील हे देखील त्यात परस्पर भागीदार झाले आहेत. १३ व १७ मार्च रोजीच्या कारवाईत १० ट्रक पकडून मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारात आणून उभे केले होते. तहसीलदार देवळा यांच्याकडे ही दंडाची रक्कम भरूनच ट्रक सोडले जातील, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र १९ मार्च २०१८ रोजी निलेश पाटील यांनी मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी यांना दोन वेळा भेटून दंड कमी करण्याची मागणी केली. मात्र ती मान्य न केल्याने निलेश पाटील यांनी आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचे ते करतो, असे धमकावत निघून गेले. १९ मार्च रोजीच रात्री हे सर्व १० ट्रक तहसील कार्यालयातून पळवून नेण्यात आले. याबाबत मालेगाव येथे छावणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्याची शिफारस अपर जिल्हाधिकाºयांनी नाशिक जिल्हाधिकाºयांमार्फत जळगाव जिल्हाधिकाºयांना केली.संबंधीत ठेकेदाराला २२ डिसेंबर २०१७ मध्ये खापरखेड्याचा वाळू गट क्र.७७ व ८१ हा ३५६२ ब्रास मंजूर वाळूसाठ्यासह देण्यात आला होता. त्याची उपविभागीय अधिकारी, अमळनेर, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग यांचे प्रतिनिधी व तहसीलदार अमळनेर यांनी २२ मार्च २०१८ रोजी या ठेक्याची पाहणी करून मोजणी केली. त्यात मंजूर वाळू साठा ३५६२ ब्रास असताना अवघ्या तीन महिन्यातच मक्तेदाराने ३६४३ ब्रास म्हणजे मंजूर साठ्यापेक्षा ८१ ब्रास अधिक तर वाळू गटाच्या सीमांकनाबाहेरही १७७ ब्रास उत्खनन केल्याचे आढळून आले आहे. यावरून वाळू ठेकेदाराने तब्बल २५८ ब्रास अतिरिक्त वाळू उत्खनन केल्याचे आढळून आले आहे. तसेच ठेकेदाराने १७ अटीशर्र्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. या अहवालावरून या वाळू ठेक्यातून उपसा स्थगित करण्यात येऊन ठेकेदारास नोटीस बजावण्यात आली होती. ठेकेदाराचा खुलासा दाखल झाला. त्याने स्वत:च्या उपस्थितीत पुन्हा मोजणीची मागणी केली. तसेच मालेगाव येथील पकडलेली वाहने व त्यांच्याकडील बारकोड आपले नसल्याचा दावा केला. तसेच ही वाहने आपल्या ठेक्यावरून भरलेली नसल्याचा दावाही केला. मात्र त्यासोबत काहीही पुरावे न दिल्याने मक्तेदाराने दिलेला खुलासा अमान्य करण्यात आला असून ठेका रद्द करण्याचा निर्णय अपर जिल्हाधिकाºयांनी गुरूवार, १९ एप्रिल रोजी दिला. मक्तेदाराला अपर आयुक्त, नाशिक यांच्याकडे अपिल करता येणार आहे.----- इन्फो----मक्तेदाराकडून ७४ लाख ३३ हजाराची वसुलीचे आदेशठेका रद्द करून त्याचा ताबा अमळनेर तहसीलदारांनी घेण्यासोबतच मक्तेदाराची २० लाख ९५ हजार ८८१ रूपयांची अनामत रक्कमही जप्त करण्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिला आहे. तसेच २५८ ब्रास अवैध वाळू उपशाबद्दल ४९ लाख ७५ हजार २७२ रूपये इतका दंड करण्यात आला असून तहसीलदार अमळनेर यांच्याकडे आदेश मिळाल्यापासून १० दिवसांत ही रक्कम जमा करावयाची आहे. तसेच पर्यावरण विषयक अटीचे उल्लंघन केल्याने पर्यावरण शुल्क म्हणून भरलेली ३ लाख ६२ हजार रूपयांची बँक हमीची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.