धुळे : महापालिकेच्या कर वसुली विभागाच्या अधीक्षकपदी लेखापाल शाखेतील के. जी. खंदरकर यांची आज नियुक्ती झाली. या पदावरील बी. एस. रनाळकर यांची बांधकाम विभागात नेमणूक करण्यात आली आहे. आयुक्त दौलतखाँ पठाण यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतल्याने महापालिकेत दिवसभर हा चर्चेचा विषय होता. आयुक्तांनी सायंकाळी बदलीसंदर्भातील टिपणीवर स्वाक्षरी केली खरी. पण त्यापूर्वीच रनाळकर यांची बदली होणार असल्याची चर्चा महापालिकेत होती. कुठलीही पूर्वसूचना न देता, कारण जाणून न घेता आयुक्तांनी विशेष अधिकारातून रनाळकर यांच्या बदलीचा निर्णय घेतल्याचे महापालिकेत बोलले जात होते. रनाळकर यांच्याकडून नियोजनाप्रमाणे अधिक रक्कमेच्या वसुलीची अपेक्षा होती. ती पूर्ण न झाल्याने बदलीचा निर्णय झाल्याचीही चर्चा आवारात होती. कर वसुली विभागातील अग्निकांडामुळे बदनामीचा डाग सोसणार्या महापालिकेत अद्याप कर वसुलीचा गाडा पूर्णत: रूळावर आलेला नाही. त्यात आॅक्टोबर २०१२ ला रनाळकर यांना वसुली विभागाच्या अधीक्षक पदाची जबाबदारी तत्कालिन आयुक्त जीवन सोनवणे यांनी सोपविली होती. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत होते. परंतु आयुक्त पठाण यांनी त्यांची बदली केली.
ुवसुली अधीक्षकपदी खंदरकर
By admin | Updated: May 10, 2014 19:14 IST