शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव येथे १० मार्चपासून ‘खान्देश संगीत महोत्सवा’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 13:24 IST

ख्यातनाम कलावंतांची जुगलबंदी

ठळक मुद्देसुर - तालाची अपूर्व मेजवानी महोत्सवाचा पहिला सुर बासरीतून

आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. ६ - गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे चाळीसगाव येथे एकदिवासीय खान्देश संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १० रोजी सायंकाळी पाच वाजता राजपूत लोकमंगल कार्यालयात सुर - तालाची अपूर्व मेजवानी चाळीसगावकरांना अनुभवाता येणार आहे.पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य बासरी वादक पंडीत विवेक सोनार हे चाळीसगावचे भूमीपुत्र. त्यांच्याच प्रयत्नातून संगीत महोत्सव होत असून यापूवीर्ही दोन वेळा असे कार्यक्रम झाले आहेत. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी चाळीसगावी येऊन महोत्सवाचा पहिला सुर बासरीतून छेडला आहे. त्यांच्या अवीट बासरीची सुरावट येथील श्रोतृवृंदाने अनुभवली आहे.१० रोजी धृपद गायक सागर मोराणकर धृपद गायन करतील. त्यांना पखवाजवर कृष्णा साळुंखे यांची साथसंगत असेल. पंडीत विवेक सोनार हे बासरी वादन करणार असून उस्ताद फजल कुरेशी त्यांना तबल्यावर साथसंगत करतील. पंडीत अमेरेंद्र धनेश्वर हे शास्त्रीय गायनाचे सुर छेडतील. त्यांना संवादिनीवर बापू चौधरी तर तबल्यावर निसर्ग देहुकर यांची साथसंगीत असेल.ते सूर निरागस...आपल्या शिष्याच्या आग्रहाखातर सुप्रसिद्ध बासरी वादक पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांनी स्वत: चाळीसगावी येऊन पाच वषार्पूर्वी बासरी वादन केले आहे. 'बोलिये क्या सुनना चाहेंगे आप...' अशी प्रेमळ साद घालीत पंडित हरिप्रसाद यांनी एकाहुन एक सरस रागांचे निरागस सूर आळवून चाळीसगावकरांना मंत्रमुग्ध केले होते. गेल्या पाच वषार्पासून गुरुकुल प्रतिष्ठान तर्फे अधुन मधुन खान्देश संगीत महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. खान्देशातील उदयोन्मुख कलावंतांना प्रेरणा आणि व्यासपिठ मिळावे. यासाठीच महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याची माहिती पंडीत विवेक सोनार यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.

टॅग्स :Chalisgaonचाळीसगावmusicसंगीत