शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

खडसे आमच्याच कडेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:43 IST

खडसेंची भूमिका ही ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

चंद्रशेखर जोशीनेत्यांमध्ये ‘मासलिडर’ असलेल्यांची संख्या कमी असते. काही जण कतृत्वापेक्षा पुर्वजांच्या पुण्याईने राजकारणात येतात तर काही जण लोकसंग्रह करत करत, नागरिकांशी समरस होत, त्यांच्या भावना समजावून घेत पुढे येतात. म्हणजेच स्वकतृत्वाने ते घडतात व हळू हळू आपला लौकीक वाढवितात. त्यांच्या व्यक्तीमत्वामुळे आवती भोवती कार्यकर्त्यांचे वर्तुळ तयार होते. जळगाव जिल्ह्यात अशाच काही नेत्यांपैकी एक म्हणजे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे होत. जिल्ह्याच्या भाजपाला वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे कोणीही नाकारणार नाही. कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यात त्यांनी पक्ष वाढविला. मात्र दोन वर्षातील त्यांची परिस्थिती पक्षाने काय केली हे सर्वच जाणतात. आता त्यात फारसे वेगळे सांगण्याची येथे गरज नाही असे वाटते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील राष्टÑवादी कॉँग्रेसच्या बैठकीनंतर पुन्हा खडसेंचे नाव चर्चेत आले. जिल्ह्यातील जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा या मतदार संघांच्या निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. कॉँग्रेसमधील नेते या दोन्ही जागांवर हक्क सांगत आहेत. तर राष्टÑवादी कॉँग्रेसमधील स्थानिक व राज्य पातळीवरील नेते मंडळीही असाच दावा करत आहे. कॉँग्रेस- राष्टÑवादी कॉँग्रेसने निवडणुकीची तयारी करत काही नावे चर्चेत आणली आहेत. यात जळगाव लोकसभा मतदार संघासाठी राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे नाव चर्चेत आणले आहे. तर रावेरसाठी एक-दोन नावे चर्चेत आहेत मात्र या मतदार संघातून राष्टÑवादीकडून खडसेंनी जागा मागितल्यास त्यांना किंवा त्यांच्या स्रुषा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना सधी देण्याची तयारी दर्शविली आहे. अगदी हीच भूमिका कॉँग्रेसने देखील ठेवली असल्याचे सांगण्यात येते. पक्षातील एका नेता खडसे यांच्या संपर्कात गेल्या काही दिवसांपासून असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्ष खडसेंची प्रतिक्षा करत असल्याचेच यावरून लक्षात येते. सद्य स्थिती लक्षात घेता खडसेंची भूमिका ही ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशीच असल्याचे लक्षात येते. यात भाजपाची भूमिका महत्वाची आहे. हा पक्ष निवडणुकीच्या पूर्ण तयारीत आहे मात्र उमेदवारीबाबत अद्याप ‘झाकली मुठ’ असाच प्रकार आहेत. मात्र सद्य स्थितीत कॉँग्रेस व राष्टÑवादीकडून खडसे आमच्याकडेच अशीची दबकत चर्चा सुरू ठेवण्यात आली आहे.