शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात 12 मतिमंदांना मिळाला आजन्म आश्रय, केशवस्मृती सेवा संस्थेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 12:35 IST

केवळ सांभाळ नव्हे तर जगणे सुसह्य

ठळक मुद्देमतिमंदांच्या पालकांसाठी 17 रोजी मार्गदर्शनमुलांच्या पालकांची सोय

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 14- 18 वर्षापुढील मतिमंदांचे जगणे सुसह्य व्हावे व पालकांनाही या मुलांचे ओङो होऊ नये यासाठी केशवस्मृती सेवा संस्थेने मतिमदांना आजन्म आधार मिळावा यासाठी ‘आश्रय माङो घर’ हा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. सध्या या घरात 12 मतिमंदांना आजन्म आश्रय मिळाला आहे. मतिमंदांच्या पालकांचे प्रश्न खूप अवघड असतात. अशा पालकांसाठी रोजचे जीवन म्हणजे रणांगण. रोज नवे मैदान, रोज नवी लढाई असते. आई-बाबा झाल्यावर आनंदात असणा:या पालकांना जेव्हा ते बालक विशेष मूल (मतिमंद) आहे, हे समजते, तेव्हा त्यांना  धक्का बसतो. मुलांसाठी वेगळी शाळा शोधणे, त्याचे संगोपन आणि प्रौढावस्थेनंतरचे अनेक प्रश्न सतावतात. मुलांमध्ये वाढत जाणारी आक्रमक शक्ती आणि दुसरीकडे पालकांची उतारवयाकडे वाटचाल. त्यामुळे पालकांना अशा मुलांना सांभाळणे जिकीरीचे जाते. ही गैरसोय दूर करण्यासाठी केशवस्मृती सेवा संस्थेने 18 वर्षापासून पुढे मतिमंद मुलांचा आजीवन सांभाळ करण्याचा वर्षभरापूर्वी निर्णय घेतला आहे. त्यासाठी आश्रय माङो घर हा प्रकल्प सुरु केला असून 3 डिसेंबर रोजी या प्रकल्पाला वर्ष पूर्ण झाले. सध्या या आश्रय घरात 12 मतिमंदांना आधार मिळाला आहे. त्यात 18 वर्षापासून तर वयाच्या 65 वर्षार्पयतचे मतिमंद आहेत. मुंबई, पुणे व नाशिक या मोठय़ा शहरांमध्ये 18 वर्षाच्या पुढील मतिमंदांसाठी हा प्रकल्प आहे मात्र खान्देशात असा प्रकल्प नव्हता. त्यामुळे मतिमंद मुलांच्या पालकांची सोय झाली आहे. ‘आश्रय माङो घर’मध्ये मतिमंदांसाठी एक वर्कशॉप विकसीत केला आहे. ज्यात या मुलांच्या आक्रमक शक्तीला वळण देण्याचा प्रय} केला जातो. त्यात ते नवनवीन वस्तू तयार करण्यात मगA असतात. जी मुले घरी आक्रमक होती ती सुद्धा अगदी आनंदाने संपूर्ण दिनचर्येत व्यस्त असतात. विविध वस्तू बनवून त्यांना रोजगारही मिळू लागला आहे. रोजगाराची ही रक्कम त्यांच्यावरच खर्च केली जाते. मतिमंदांच्या पालकांसाठी 17 रोजी मार्गदर्शन18 वर्षाच्या पुढील मतिमंदांसाठीच्या ‘आश्रय’बाबत जनतेला माहिती मिळावी, यासाठी केशवस्मृती सेवा संस्थेतर्फे 17 डिसेंबर रोजी कांताई सभागृहात मतिमंदांवरील ‘कच्चा लिंबू’ हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार असून या चित्रपटाचे निर्माते मंदार देवस्थळी हे मार्गदर्शन करणार आहेत. याचवेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बदलापूर येथील आधार संस्थेचे संचालक विश्वास गोरे हे मार्गदर्शन करणार आहेत.‘आश्रय-माङो घर’ हे शहरापासून काही अंतरावर असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमाच्या आवारात आहे. वर्षभरातच मुलांचे ‘आश्रय’वरील प्रेम घट्ट झाले आहे. दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये आई-बाबा त्यांना घ्यायला आले असता, ही मुले घरी जाण्यास नकार देतात, हेच ‘आश्रय’चे यश आहे.-अमित पाठक, सचिव, आश्रय माङो घर