शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवस विद्यापीठातील संपूर्ण विभाग बंद ठेवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नसून दिवसाला हजाराच्यावर कोरोना बाधित जिल्ह्यात आढळून येत आहे. विद्यापीठातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नसून दिवसाला हजाराच्यावर कोरोना बाधित जिल्ह्यात आढळून येत आहे. विद्यापीठातील सुमारे पंचवीस ते तीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एका कनिष्‍ठ अभियंत्याचा मृत्यू सुद्धा झाला आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सात दिवस विद्यापीठातील संपूर्ण विभाग बंद ठेवण्‍यात यावेत, अशी मागणी उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने प्रभारी कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

विद्यापीठ कार्यालय व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक कर्मचारी व अधिकारी कोरोना बाधित आहेत. तर विद्यापीठातील कनिष्ठ अभियंता यांचा नुकताच कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विद्यापीठातील संपूर्ण विभाग व परिसर सात दिवस बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्‍यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे अध्‍यक्ष राजू सोनवणे, जयंत सोनवणे, अरविंद गिरणारे, अरूण सपकाळे, केशव पाटील, शामकांत भादलीकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रभारी प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव पॉझिटिव्ह

विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. हे प्रमाण आता हळूहळू वाढत आहे. नुकतेच प्रभारी प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव तसेच जनसंपर्क अधिकारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यापीठ बंद ठेवण्‍यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली परवानगी

उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय संघटना, युनिर्व्हसिटी अधिकारी संघटना, उमवि युनिट आदी संघटनांच्या वतीने निवेदन देऊन विद्यापीठ सात दिवस बंद ठेवण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे. या मागणीची दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सात दिवस विद्यापीठ बंद ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितली आहे.