शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

कवितेनं दिली प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 10:54 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात नंदुरबार येथील आर्किटेक्चर तथा कवी नीरज पद्माकर देशपांडे यांनी आपल्या लेखन प्रेरणेचे उलगडलेले रहस्य...

मूळात आर्किटेक्ट आणि लिखाण हा विषय एकमेकांना फार काही पूरक नाही; म्हणजे आयुष्यभर उभ्या-आडव्या रेघोट्या मारत बसणे हा आर्किटेक्टस्चा उद्योग असा अनेकांचा ग्रह असतो. अशा प्रत्येक धारणेला काही अपवाद असतात आणि मीदेखील त्यापैकी एक व्हायचं ठरवलं, हीच माझी लेखन प्रेरणा आहे.पा चवीत असतानापासूनच मला कविता रचण्याचा छंद जडला. कवितेचा वारसा माझी आई पद्मजा देशपांडेंकडून मिळाला. शाळेत मला प्रोत्साहन दिले ते राजेश कोळी, सीमा पाटील आणि इतर शिक्षकांनी. तसेच संदीप पाटील, नीरज भोळे आणि इतर अनेक मित्रांनी. पुढे महाविद्यालयीन काळात आर्किटेक्ट्स आणि आर्किटेक्चरविषयी अधिक जागृत करण्याचा विचार पक्का होऊ लागला. तिथूनच लिखाणाला दिशा आणि उद्दिष्ट मिळाले, त्या सुरुवातीच्या काळात दीपक कुळकर्णी, नंतर रमाकांत पाटील यांनीदेखील माझ्या लिखाणाला प्रोत्साहीत केले. दरवर्षी ‘वर्ल्ड आर्किटेक्चर डे’निमित्तच्या लेखांमधून तसेच कवितांद्वारे माझं ‘आर्किटेक्चरल अवेअरनेस कॅम्पेन’ आकार घेत आहे.माझे वडील प्राचार्य अ‍ॅड. प.नि.देशपांडे, पत्नी जयंती आणि माझ्या सासूबाई प्रा.डॉ.चारुता गोखले यांच्या आग्रह व प्रेरणेने २०१६ मध्ये माझा पहिला काव्यसंग्रह ‘रंग नात्यांचे’ प्रसिद्ध झाला. मला फक्त माणसांनीच प्रेरित केले असे नाही; तर एका निर्जीव विटेशी झालेला माझा संवादही कविता बनून अनेकांना स्पर्शून गेला. आर्किटेक्चरविषयी लिहिणारे, बोलणारे, वाचणारे सर्वच ज्ञात-अज्ञात लोक सतत माझी लेखन प्रेरणा बनून माझी पाठराखण करत राहतील यात शंका नाही.- नीरज पद्माकर देशपांडे, नंदुरबार