फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : श्री क्षेत्र पंढरपूर येथील दिगंबर महाराज मठात कार्तिक वारी महोत्सव आयोजित केला आहे. यात ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान कीर्तन प्रवचन व अन्नदान कार्यक्रम होईल. यात गादीपती हभप दुर्गादास महाराज नेहते व गोपाळ महाराज विवरेकर, भाऊराव महाराज मुक्ताईनगर, पराग महाराज चोपडे भालोद, मुकेश महाराज कळमोदा, उमेश महाराज मावळे उदळी हे उपस्थित राहतील. मठामध्ये निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.उपस्थितीचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे, सहसचिव विजय ढाके, खजिनदार योगेश भंगाळे, किशोर बोरोले, जयराम पाटील, विनायक गारसे, त्रंबक चौधरी, डिगू बºहाटे, भगवंत महाराज चौधरी, विजय महाजन रोझोदा, आशाबाई तळेले, गीता चौधरी, सोनू भंगाळे ,प्रहाद वाघूलदे, प्रमोद इंगळे, भास्कर इंगळे, चत्रभुुज खाचणे व गुणवंत नेमाडे यांनी केले आहे.
पंढरपूर येथील दिगंबर महाराज मठात कार्तिक वारी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 18:23 IST
श्री क्षेत्र पंढरपूर येथील दिगंबर महाराज मठात कार्तिक वारी महोत्सव आयोजित केला आहे.
पंढरपूर येथील दिगंबर महाराज मठात कार्तिक वारी महोत्सव
ठळक मुद्दे६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान कीर्तनप्रवचन आणि अन्नदान कार्यक्रमपंढरपूरच्या मठात निवास व भोजनाची व्यवस्था