शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कापूर दीडपटीने महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 12:11 IST

‘जीएसटी’चा परिणाम : अगरबत्तीला कर लागू, दर ‘जैसे थे’

ठळक मुद्देअगोदर मूळ किंमतीत वाढ 18 टक्के थेट जीएसटीजीएसटी टाळण्यासाठी अनोखी शक्कल

ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल 

जळगाव, दि. 13 -  वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंचे भाव वधारले असताना यातून पूजेचे साहित्यही सुटलेले नाही. जास्त वापर नसला तरी दररोज घरोघरी व मंदिरात सकाळ-संध्याकाळ देवापुढे ज्योत लावली जाते त्या कापूरचे भाव थेट दीडपटीने वाढले आहे. अगोदर मूळ किंमतीत वाढ जीएसटी लागू होण्यापूर्वीच कापूरच्या मूळ किंमतीत भाववाढ झाली. पूर्वी 400 ते 450 रुपये प्रति किलो असणा:या कापूरचे भाव 100 रुपये प्रति किलोने वाढून त्याचे भाव 500 ते 550 रुपये किलोवर पोहचले. चार महिन्यात सात टन कापूरचा वापरकापूराचा वर्षभर वापर केला जात असतो.  त्यात सध्या व्रतवैकल्यांचा श्रावण मास सुरू असून याच महिन्यापासून चार महिने कापराचा सर्वाधिक वापर केला जात असतो.   एकटय़ा जळगाव जिलत श्रावणाचे दिवस ते दिवाळी अशा चार महिन्याच्या कालावधीत तब्बल सात टन कापूरचा वापरला जात        असल्याचे काही विक्रेत्यांशी संपर्क साधला असता समजले. परराज्यातून मोठय़ा प्रमाणात आवकजळगावच्या बाजारपेठेत मुंबई, नागपूर यासह चेन्नई, उज्जैन, अहमदाबाद येथून मोठय़ा प्रमाणात कापूर येतो. येथून तो विविध तालुक्यांच्या ठिकाणी विक्री साठी पाठविला जात असतो.  पूर्वी जळगावातील व्यापारी ललित बरडिया हे कापूरची निर्मिती करीत असत, मात्र याची मजुरी वाढल्यामुळे हे उत्पादन बंद करण्यात आल्याचे बरडिया यांनी सांगितले. त्यापेक्षा आता तयार माल येत असल्याने त्याचाच व्यापार केला जातो, असेही ते म्हणाले. शहरातील काही घाऊन व्यापा:यांकडून हा कापूर तालुक्यांच्या ठिकाणी विक्रीसाठी जात असतो. 18 टक्के थेट जीएसटीजीएसटी लागू होण्यापूर्वी कापूरवर कर नव्हता. मात्र 1 जुलैपासून त्यावर थेट 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे आधीच           500 ते 550 रुपये किलोवर पोहचलेल्या कापूरचे भाव आता 600 ते 625 रुपये प्रति किलो झाले आहे. एकूणच पूर्वीच्या भावामध्ये थेट दीडपट वाढ झाली आहे.

जीएसटी टाळण्यासाठी अनोखी शक्कलकापूरवर जीएसटी लावण्यात आल्याने भेसळयुक्त कापूरची निर्मितीही होऊ लागली आहे. त्यामुळे त्याची कमी दरात विक्री होत असल्याचे व्यापा:यांचे म्हणणे आहे. जो अस्सल कापूर असतो, तो पूर्ण जळतो, मात्र भेसळयुक्त कापूर जळाल्यानंतर शेवटी राख शिल्लक राहते, ही भेसळयुक्त कापूरची ओळख असल्याचे सांगितले जाते. अगरबत्तीचे भाव स्थिरपूजेसाठी आवश्यक असलेल्या अगरबत्तीवरदेखील 5 टक्के जीएसची  आहे. याचा उलट उत्पादकांना फायदा झाल्याचेही चित्र आहे. कारण पूर्वी अगरबत्तीसाठी आवश्यक रसायनासाठी उत्पादन शुल्क व इतर कर मिळून 18 ते 28 टक्के कर होता.आता जीएसटी केवळ 5 टक्के असल्याने कर कमी झाल्याचा फायदा आहे. जीएसटी लागला तरी अगरबत्तीच्या भावात वाढ झालेली नाही. पूर्वी कापूरवर कर लागत नव्हता. आता 18 टक्के जीएसटी लागत आहे. त्यात मूळ किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे कापूरचे भाव जवळपास दीडपटीने वाढले आहेत. श्रावण मास ते दिवाळीर्पयत चार महिन्यात जळगाव जिल्ह्यात 7 टन कापूर वापरला जातो.-ललित बरडिया, कापूर व्यापारी तथा माजी अध्यक्ष, एकता रिटेल किराणा असोसिएशन