नंदुरबार : कापसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी विविध सात वाहनांद्वारे सुमारे 100 क्विंटल कापसाची आवक झाली. यात 4200 ते 4400 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे शेतक:याला भाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत घुली-पळाशी शिवारात कापूस खरेदी केंद्रात परवानाधारक व्यापा:यांनी कापूस खरेदीस सुरुवात केली. कापसाचा लिलाव होण्याआधी बैलगाडय़ा, टेम्पो, मिनीट्रक, माल वाहतूक करणारी रिक्षा अशा एकूण सात वाहनांद्वारे कापूस विक्रीसाठी शेतक:यांनी आणला होता. वाहनांची नोंदणी झाल्यानंतर बाजार समितीने नियुक्त केलेल्या परवानाधारक व्यापा:यांनी संपूर्ण कापसाची लिलावाद्वारे खरेदी केली. नंदुरबारसह वरूळ, पळाशी, धमडाई गावासह परिसरातील शेतक:यांनी आज पहिल्या दिवशी कापूस विक्रीसाठी आणला होता. याआधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य अशासकीय प्रशासक व्यंकटराव भगा पाटील यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी उपमुख्य प्रशासक हरिभाई पाटील, सचिव योगेश अमृतकर, जूनमोहिदा येथील सरपंच नरेंद्र पाटील, खरेदीदार अशोक चौधरी, प्रकाश अग्रवाल, शिरीष अग्रवाल यांच्यासह शेतकरी, तसेच बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते. पहिला मान दरम्यान, बाजार समितीच्या यार्डात कापूस आल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या खरेदीचा मान नंदुरबार येथील शरद तांबोळी या शेतक:याला मिळाला. या शेतक:याच्या कापसाला 4400 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे भाव मिळाला. बाजार समितीच्या या यार्डालगत व परिसरात अर्धा डझन जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहेत. शेतक:यांकडील माल परवानाधारक खरेदीदाराने खरेदी केल्यानंतर जवळील जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीत लागलीच प्रक्रिया करून त्याच्या गठाणी तयार केल्या जातात. कापसाच्या मोजणीपासून तर गठाणी तयार करणे, तसेच वाहनचालक, मजूर अशा जवळपास तीनशेवर नागरिकांना यानिमित्ताने रोजगार मिळाला आहे. गेल्या वर्षी बाजार समितीच्या यार्डात भारतीय कपास निगम अर्थात सीसीआयआयमार्फत एक लाख 90 हजार क्विंटल, तर बाजार समिती नियुक्त खरेदीदारांनी 22 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली होती. तथापि, यंदा तब्बल 40 दिवस पावसाने ओढ दिल्यानंतर आलेला पाऊसही कापूस पिकासाठी नुकसानदायक ठरला आहे. परिणामी यंदा बाजार समिती यार्डात विक्रीसाठी किती माल येतो हे लवकरच समजेल. गतवर्षी सीसीआयने कापसाला चार हजार ते 4100 रुपये प्रती क्विंटलर्पयत भाव दिला होता. परंतु बाजार समिती नियुक्त खरेदीदारांकडून आजच्या स्थितीत 4200 ते 4400 रुपये प्रती क्विंटलने भाव मिळत आहे. सीसीआयची कापूस खरेदी दस:यानंतर सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घुली-पळाशी येथे बाजार समितीच्या यार्डात कापूस आल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेसाठी सात वर्षापूर्वी पावणेतीन कोटी रुपये खर्च करून अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. पाच एकर क्षेत्रातील यार्डात काँक्रिटीकरणाचा प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे. कापसाला काडीकचरा लागू नये, काही नुकसान होऊ नये यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. - योगेश अमृतकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार
कापसाला 4200 ते 4400 भाव
By admin | Updated: October 13, 2015 23:10 IST