शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम कन्यारत्न प्राप्त मातांचा कजगाव येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 18:00 IST

कजगाव येथे सरपंच वैशाली पाटील यांच्यातर्फे येथील प्रथम कन्यारत्न प्राप्त अशा ३८ महिलांचा नागरी सत्कार मान्यवर महिलांच्या उपस्थितीत महिला दिनी झाला.

ठळक मुद्देग्रामीण भागात पहिल्यांचाच महिलांचा झाला सन्मानयासोबतच इतरही महिलांचा झाला गौरव

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथे सरपंच वैशाली पाटील यांच्यातर्फे येथील प्रथम कन्यारत्न प्राप्त अशा ३८ महिलांचा नागरी सत्कार मान्यवर महिलांच्या उपस्थितीत महिला दिनी झाला. वाणी समाज मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.जागतिक महिला दिनी येथील प्रथम कन्यारत्न प्राप्त अशा ३८ महिलांचा साडी, चोळी, नारळ कन्यास ड्रेस देत मान्यवर महिलांच्या हस्ते सत्कार करीत सन्मानित करण्यात आले, तर विशेष सत्कारात येथील कर्णबधिर व मुक्या असलेल्या उषा सोनवणे या महिलेचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.याबरोबरच याच महिलेचा येथील साधना धाडीवाल, लता ललवाणी, भारती सोनार, नंदा वाणी यांनी भेट वस्तू देत त्यांचा सत्कार केला.याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती गीता पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुचिता आकडे, कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय सपकाळ, पं.स.सदस्या डॉ.अर्चना पाटील, बेटी बचाव बेटी पढाओच्या सहयोजिका वसुधा पाटील, सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच मंगलाबाई भिल्ल, चाळीसगावच्या माजी नगराध्यक्षा वैशाली पाटील, ओमशांती केंद्राच्या चंद्रकला दिदि, आशा गटप्रमुख सुनंदा, अंगणवाडी मुख्य सेविका मंगला पाटील, मुख्याध्यापिका लता, माजी सरपंच रत्ना पाटील, लताबाई निकम, सुकन्या सोनवणे, रंजनाबाई महाजन, आशाबाई पवार, साधना धाडीवाल, लता ललवाणी, वैशाली सुनील पाटील, भारती सोनार, नंदा वाणी, उद्योजक दिनेश पाटील, नितीन सोनार, सुनील पवार, रघुनाथ महाजन, रवी मालचे, संजय जाधव, सुनील पाटील, रघुनाथ पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील महिला उपस्थित होत्या.येथीलच रहिवासी असलेल्या कर्णबधीर व मुकी असलेल्या उषा दीपक सोनवणे या महिलेने लोकांकडे धुणी भांडी करत आपल्या या दोघा मुलांना इंग्रजी शाळेत शिकवायला सुरुवात केली आहे. तिच्या या कामाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. अशा या महिलेचा सरपंच वैशाली पाटील यांनी विशेष सत्कार केला. त्याबरोबरच साधना धाडीवाल, लता ललवाणी, भारती सोनार,नंदा वाणी यांनाही गौरविण्यात आले.‘लोकमत’ने महिला दिनी काढलेल्या विशेष पुरवणीत ग्रामीण भागातील महिलांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत लेखाजोखा मांडला होता. या पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

टॅग्स :WomenमहिलाBhadgaon भडगाव