ट्रक चालकाचे देव बलोत्तर होते म्हणून ट्रक चालकाचे आज प्राण वाचल्याची चर्चा मात्र दिवसभर होती. चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावर ट्रक(क्र.पीआय,जीएफ.०६८३) चाळीसगावकडे येत असताना, अचानक ट्रकचे ब्रेक फैल झाले. त्यामुळे चालकांना ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या व हजारो भक्तांचे श्रध्दा असलेल्या म्हसोबा देवस्थानच्या पत्री शेडला जाऊन धडकला, यात पत्री शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. म्हसोबा देवस्थान जर नसते, तर ट्रक खोल दरीत जाऊन पडला असता. ट्रक चालकाचे व इतरांचे प्राण गेले असते. म्हसोबा देवस्थान हे कन्नड घाटत स्थापन झाल्यापासून अस्तित्वात असून घाटातून जाणारे वाहन चालक म्हसोबाचे दर्शन व नारळ फोडल्याशिवाय पुढे जात नाही. या देवस्थानाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगण्यात येत असून भक्तांच्या हाकेला नेहमीच म्हसोबा धावून जातो आज याचा प्रत्यय पुन्हा आल्याची चर्चा आहे.
कन्नड घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक देवस्थानच्या शेडवर आदळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST