शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे कांदाफेक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 16:03 IST

कांद्याला एक मणसाठी ५०० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कांदेफेक आंदोलन केले

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. २६ -  कांद्याला एक मणसाठी ५०० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एकही अधिकारी न भेटल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला निवेदन चिटकविण्यात आले. तसेच दालनाजवळ कांदे फेक आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश देसले, राष्ट्रवादी युवती प्रमुख कल्पिता पाटील, लिगल आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.सचिन पाटील, अ‍ॅड.कुणाल पाटील, शितल पाटील, रुपाली मराठे, ललित बागुल,पंकज वाघ यांच्यासह कार्यकर्ते शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाजवळ आले. या ठिकाणी स्वीय साहाय्यकांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या कार्यालयात नसल्याने त्यांची भेट होऊ शकत नसल्याचे निवेदनकर्त्यांना सांगितले. त्यानंतर पदाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे आले. मात्र मुंडके देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भेटले नाही. त्यानंतर कार्यकर्ते पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाजवळ आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय साहाय्यकांनी उपजिल्हाधिकारी साजीद पठाण हे दालनात असून त्यांच्याकडे निवेदन देण्यास सांगितले. मात्र आंदोलनकर्त्यांनी पठाण यांना निवेदन स्विकारण्यासाठी या ठिकाणी बोलवावे असा आग्रह धरला.संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला निवेदन चिटकविले तसेच एकही अधिकारी जागेवर नसल्याच्या निषेधार्थ सोबत आणलेली कांद्यांची गोणी दालनाजवळ रिकामी केली.