शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या हल्ल्यात कंडारीचा शेतमजूर गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 00:34 IST

हाताचा लचका तोडला : पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी जात असताना घातली झडप

जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या रायपूर कंडारी शिवारातील शेतात पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या दुरसिंग कन्हैया बारेला (32, रा. कंडारी) या शेतमजुरावर बिबटय़ाने हल्ला करीत हाताचा लचका तोडल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6.45 वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतमजूर  गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.   वाघूर धरण परिसरातील रायपूर कंडारी शिवारात दिलीप कोल्हे यांचे शेत आहे. या शेतात दुरसिंग बारेला हे शेतमजूर व रखवालदार म्हणून गेल्या अनेक  वर्षापासून काम करीत आहेत. शुक्रवारी सकाळी शेतात ते पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी पंपाजवळ गेले असता दडून बसलेल्या बिबटयाने अचानक बारेला यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या उजव्या हाताचा लचका तोडल्याने ते जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपाल डी. आर. बडगुजर यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.शेतक:यांमध्ये दहशतबिबटय़ाच्या हल्यामुळे वाघूर धरण व रायपूर कंडारी परिसरात शेती असलेल्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यापूर्वीदेखील अनेकवेळा या परिसरात बिबटय़ांचा संचार असल्याचे दिसून आले आहे.थरकाप उडविणारा दुहेरी हल्लाबारेला मोटार सुरू करायला गेले आणि समोरून थेट बिबटय़ाने त्यांच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्याने बारेला यांचा थरकाप उडाला व  त्यांनी प्रतिकार केला. त्यावेळी हा बिबटय़ा माघारी परतला. मात्र क्षणार्धात पुन्हा त्याने चवताळून हल्ला केला व थेट उजव्या हाताचा लचका तोडला. या वेळी बारेला यांनी  प्रतिकार करून कशी-बशी सुटका केली आणि आरडा ओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ धावून आले. त्यावेळी बिबटय़ाने तेथून पळ काढला. जखमी अवस्थेतील बारेला  यांना  तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहीती वैद्यकीय सूत्रांनी दिली.