शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कैलास सोनवणेंची याचिका फेटाळली

By admin | Updated: August 26, 2014 14:55 IST

प्रशांत सोनवणे खून प्रकरणात नगरसेवक कैलास सोनवणे व माजी उपमहापौर भारती सोनवणे यांच्यासह ११ जणांना आरोपी करण्याबाबतचा जिल्हा न्यायालयाचा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने कायम ठेवला.

जळगाव : शनी पेठ भागातील प्रशांत सोनवणे खून प्रकरणात नगरसेवक कैलास सोनवणे व माजी उपमहापौर भारती सोनवणे यांच्यासह ११ जणांना आरोपी करण्याबाबतचा जिल्हा न्यायालयाचा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने कैलास सोनवणे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी सोनवणे यांना चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मयत प्रशांत याची आई राधाबाई सोनवणे यांचा सीआरपीसी कलम १६४ प्रमाणे जबाब नोंदविला होता. यावेळी त्यांनी नगरसेवक कैलास सोनवणे, नंदकिशोर खुशाल सपकाळे, प्रल्हाद नारायण सोनवणे, भारती कैलास सोनवणे, संजय प्रभाकर साळुंखे, सागर प्रल्हाद सोनवणे, संजय गंगाराम सपकाळे, विलास नारायण सोनवणे, आदेश नरेंद्र सपकाळे, विशाल प्रल्हाद सपकाळे, जयदीप प्रल्हाद सोनवणे यांच्या विरुद्ध जबाब दिला होता.
जिल्हा न्यायालयात १६ जून रोजी राधाबाई यांची न्या.एम.क्यू.एस. एम.शेख यांच्या कोर्टात साक्ष झाली. ंत्यांनी या खून प्रकरणातील आरोपींसोबत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह ११ जणांना आरोपी करण्यासाठी अर्ज दिला होता. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी न्या.शेख यांनी कैलास सोनवणे यांच्यासह ११ जणांना या खटल्यात आरोपी करून १४ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स काढले होते. कैलास सोनवणे यांच्यासह अन्य संशयितांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्व ११ आरोपींविरुद्ध २५ ऑगस्टपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत.
 
अपीलसाठी चार आठवड्यांची मुदत 
या प्रकरणाचे कामकाज सोमवारी न्या.एम.टी.जोशी यांच्या कोर्टात झाले. दोन्ही बाजूचे म्हणणे एकू न घेत कैलास सोनवणे यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली व जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. याचिकाकर्ते यांच्यातर्फे अँड.व्ही.डी. सपकाळ यांनी या निर्णयाच्या विरोधात अपिल करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली. न्यायालयाने याचिकाकर्ते यांची ही मागणी मान्य केली. सरकारतर्फे अँड.एस.एम. जाधव यांनी कैलास सोनवणे यांच्यातर्फे अँड.व्ही.डी.सपकाळ यांनी तर राधाबाई सोनवणे यांच्यातर्फे अँड.आनंदसिंग बयास यांनी काम पाहिले. 
 
 
८ जुलै रोजी झाला होता खून
 
प्रशांत सोनवणे याचा ८ जुलै रोजी शेळगाव रस्त्यावरील रामदासबुवा नाल्याजवळ अर्धवट जळालेंल्या स्थितीत मृतदेह सापडला होता. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ९ जुलै रोजी मयत प्रशांत याची ओळख पटली होती.