शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोनच दिवसांत ‘वाघूर’च्या साठ्यात आठ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST

जळगाव : पावसाळ्याच्या शेवटचा महिना उजाडला त्यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील एकूण जलसाठ्याने पन्नाशी ओलांडली असून, सोमवारी (दि. ६) हा ...

जळगाव : पावसाळ्याच्या शेवटचा महिना उजाडला त्यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील एकूण जलसाठ्याने पन्नाशी ओलांडली असून, सोमवारी (दि. ६) हा साठा ५१.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून घट होत गेलेल्या वाघूर धरणसाठ्यातही गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे वाढ होऊन धरणसाठा ७३.६० टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे शनिवारी मध्यरात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर धरण साठ्यात दोनच दिवसात ७.५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गिरणा धरणसाठाही ४७.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी ५५ टक्क्यांवर असलेले तोंडापूर धरण एकाच दिवसात ९३.४१ टक्क्यांवर पोहोचले आहे.

यंदा सलग पाऊस नसल्याने मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये किरकोळ चढ-उतार होत गेला. जून महिन्याच्या सुरुवातीला प्रकल्पांमध्ये ३२.७३ टक्के जलसाठा होता. तो ७ ऑगस्टपर्यंत केवळ ३६.०६ टक्क्यांवर पोहोचला. दोन महिन्यांत केवळ ३.३३ टक्के वाढ होऊ शकलेल्या जलसाठ्यात मात्र आता ७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान थेट १५.८४ टक्क्यांनी वाढ होऊन जिल्ह्यातील एकूण जलसाठा ५१.९० टक्क्यांवर पोहोचला आहे.

पाच दिवसांत ‘वाघूर’मध्ये ११ टक्क्यांहून अधिक वाढ

जळगाव व जामनेर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या वाघूर धरण साठ्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर वाढ होण्याऐवजी उलट घट होत गेली होती. त्यामुळे ६५.०८ टक्क्यांवरून धरणसाठा ७ ऑगस्टपर्यंत ६२.१७ टक्क्यांवर आला होता. मात्र, गेल्या पाच दिवसांतच या धरणसाठ्यात ११.३४ टक्क्यांनी वाढ झाली व धरणसाठा ७३.६० टक्क्यांवर पोहोचला आहे. वाघूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात चांगली आवक सुरू झाली आहे. १ सप्टेंबर रोजी या धरणात ६२.६६ टक्के जलसाठा होता तो दररोज वाढत गेला व आता ७० टक्क्यांच्या पुढे पोहोचला आहे. यंदा ७३.६० टक्क्यांपर्यंत वाघूर धरणाचा साठा पोहोचला असला तरी गेल्या वर्षी ५ सप्टेंबर रोजी हे धरण १०० टक्के भरले होते. यंदा मात्र पावसाळ्याचा शेवटचा महिना उजाडला तरी ते २७ टक्क्यांनी खालीच आहे. दोन दिवसांतील मोठी वाढ पाहता यात आणखी चांगली भर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.