शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावकरांना आज अनुभवता येणार गुरू-शुक्राची युती; १५ वर्षानंतर दिसणार विलोभणीय क्षण

By ajay.patil | Updated: February 28, 2023 19:18 IST

खगोलप्रेमींसह जळगावकरांना बुधवारी दुर्मीळ व विलोभणीय खगोलीय घटनेचे साक्षीदार होता येणार असून, बुधवारी सुर्यास्तानंतर पश्चिम आकाशात गुरू आणि शुक्र ग्रहांची युती पहावयास मिळणार आहे.

जळगाव, अजय पाटील- खगोलप्रेमींसह जळगावकरांना बुधवारी दुर्मीळ व विलोभणीय खगोलीय घटनेचे साक्षीदार होता येणार असून, बुधवारी सुर्यास्तानंतर पश्चिम आकाशात गुरू आणि शुक्र ग्रहांची युती पहावयास मिळणार आहे. ही अशी युती १५ वर्षानंतर दिसत असून पुन्हा पाहण्यासाठी १५ वर्षाची वाट पहावी लागणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

त्यामुळे बुधवारी हा दुर्मीळ योग खगोलप्रेमींसह जळगावकरांना अनुभवता येणार आहे. सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या गुरू आणि शुक्र हे मीन राशीत असून ते गेल्या आठवड्यापासून जवळ येत होते. १ मार्च रोजी हे दोन्ही ग्रह जवळ येणार असून, ५ मार्चपर्यंत ही युती जवळ राहणार असली तरी सर्वाधिक जवळ १ मार्चला राहणार आहे. आकाशात सर्वाधिक तेजस्वी असे दोन ग्रह एक डिग्री पेक्षा कमी अंतरावर येण्याची आणि पाहण्यासाठीचीही दुर्मीळ संधी आहे .ही युती भासमान युती आहे, जरी हे दोन ग्रह जवळ दिसत असले तरी पृथ्वी पासून त्यांचे अंतर खुप जास्त आहे.  बुधवारी शुक्र पृथ्वीपासुन २० कोटी ५६ लाख ३१ हजार १४१ किमी तर गुरू ८६ कोटी १८ लाख ४३ हजार १९२ कोटी किमी अंतरावर असतील. बुधवारी दोघांतील अंतर एक डिग्रीच्या कमी म्हणजे ३९ आर्कमीटर अंतरावर असेल तर २ मार्चला ४५ आर्कमीटर अंतरावर असेल.

यादरम्यान शुक्राची तेजस्विता -४.२ तर गुरुची तेजस्विता -२ ० असेल. ५ मार्च पर्यंतसुद्धा ते १ ते २ डिग्री इतक्याकमी अंतरावर असतील. त्यानंतर मात्र गुरू ग्रह सूर्याकडे गेलेला दिसेल तर शुक्र आकाशात वर येताना दिसेल. दरम्यान, या दुर्मीळ खगोलीय घटनेचे साक्षीदार होता यावे यासाठी जळगाव खगोलप्रेमी गृप व मु.जे.महाविद्यालय भुगोल विभागाकडून ही घटना पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी खगोलप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मु.जे.महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.