शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जुगाराचा डाव उधळला : ३२ अटकेत

By admin | Updated: May 20, 2017 00:24 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्यावरील हॉटेल रावसाहेबवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ३२ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली

ऑनलाइन लोकमतभुसावळ, दि. 20 - मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्यावरील हॉटेल रावसाहेबवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ३२ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली तर दहा दुचाकींसह चार चारचाकी व तीन लाख ४० हजारांची रोकड व एक लाख १९ हजारांचे देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे़ जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या धाडीनंतर जुगाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे़अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या सूचनेनुसार व भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ या कारवाईत उपनिरीक्षक युवराज अहिरे, प्रदीप पाटील, एएसआय दिलीप कोळी, संकेत झांबरे, विशाल चव्हाण, राजेश काळे, बाजारपेठचे प्रशांत चव्हाण, नीलेश बाविस्कर, राहुल चौधरी, गुरुबक्ष तडवी, नंदलाल परदेशी, शहरचे विनोद वीतकर, शंकर पाटील, समाधान पाटील, सोपान पाटील यांचा सहभाग होता़ दरम्यान, हॉटेल मालक युवराज पाटील व ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरूच होती़.साध्या वाहनातून टाकली धाडपोलीस आल्याची माहिती जुगाऱ्यांना कळू नये यासाठी भुसावळातून निघालेल्या पथकाने तीन साध्या वाहनांचा वापर केला त्यामुळे जुगाऱ्यांना पोलीस कारवाईचा सुगावा लागला नाही़ दरम्यान, बुधवारीदेखील पोलीस पथकाने या हॉटेलची टेहळणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.