मंगळवारी अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरात सकाळपासूनच जळगाव शहरातील व परिसरातील गावांमधुन नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नागरिकांची होणारी गर्दी आणि त्यात मंदिर बंद असल्यामुळे मंदिर प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य दरवाजा बंद ठेवला होता. मात्र सकाळपासून भाविक दर्शनाला येत होते. दर्शनासाठी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्यामुळे, मंदिराच्या पायऱ्यांवरच अनेक भाविकांनी धुप-अगरत्ती, पुजा, प्रसाद व नारळ फोडून मनोभावे गणरायाचे दर्शन घेतांना दिसून आले.
इन्फो :
भाविकांना ऑनलाईन दर्शनाचींही सुविधा :
मंदिर प्रशासनातर्फे कोरोनामुळे मंदिर बंद असल्यामुळे, नागरिकांना घरूनच दर्शन घेता यावे, यासाठी फेसबुक द्वारे ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार हजारो नागरिकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे तरसोद देवस्थानचे संचालक आश्विन सुरतवाला यांनी सांगितले.