शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना यंदा ऑन जॉब ट्रेनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:12 IST

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्राध्यापकांना बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत दोन दिवशीय कार्यशाळेतून ...

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्राध्यापकांना बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत दोन दिवशीय कार्यशाळेतून प्रशिक्षण देण्यात आले. नवीन बदलांनुसार आता कौशल्याधारित अभ्यासक्रम असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना आता यंदापासून ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतीय वैद्यकीय परिषदचे (एमसीआय) नाव राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) असे झाले आहे. या आयोगाच्या निर्देशानुसार हे प्रशिक्षण घेणे सक्तीचे आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अभ्यासक्रमात आता बदल झालेला आहे. प्राध्यापकांना अद्ययावत माहिती देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञान युनिटच्यावतीने प्रशिक्षण देण्यात आले. उद्‌घाटन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत डॉ. किशोर इंगोले, डॉ. विजय गायकवाड, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विलास मालकर, डॉ. संगीता गावित, डॉ. इम्रान तेली, डॉ. योगिता सुलक्षणे, डॉ. मोनिका युनाती, डॉ. जितेंद्र सुरवाडे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात ३० प्राध्यापकांचा सहभाग होता. समारोप अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्या उपस्थितीत झाला. सहभागींच्यावतीने डॉ. शैला पुराणिक, डॉ. बाळासाहेब सुरोसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेसाठी डॉ. गणेश लोखंडे, विशाल दळवी, प्रदीप जैस्वाल, राकेश सोनार, राकेश पिंपळकर यांनी परिश्रम घेतले.

फोटो आहे.