शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जेसीआयतर्फे ट्रेनिंग डे साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:13 IST

जळगाव : जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे ट्रेनिंग डे उत्साहात साजरा करण्‍यात आला. या वेळी चंद्रपूरच्या ट्रेनर श्‍वेता जयस्वाल यांनी ...

जळगाव : जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे ट्रेनिंग डे उत्साहात साजरा करण्‍यात आला. या वेळी चंद्रपूरच्या ट्रेनर श्‍वेता जयस्वाल यांनी संपूर्ण संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले. नेव्हर गिव्ह अप, तसेच ‘जीना इसी का नाम है’ या दोन विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. जेसीआयचे झोन व्हाइस प्रेसिडेंट राहुल पवार यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन झोन अधिकारी जीनल जैन यांनी केले. तर आभार सचिव सुवर्णा चौधरी यांनी मानले. यशस्वितेसाठी सुशील अग्रवाल, फिरोज शेख, विशाल शर्मा, कुलदीप बुवा, कमलेश अग्रवाल, प्रशांत पारिक, पीयूष गुजराथी, ललित नेमाडे आदींनी परिश्रम घेतले.

============

जेसीआयतर्फे जलसेवा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जेसीआय जळगाव व गुजरात स्वीट मार्ट यांच्या वतीने गोलाणी मार्केट येथील दुसऱ्या मजल्यावर मोफत जलसेवा सुविधा सुरू करण्‍यात आली आहे. या उपक्रमाप्रसंगी जीआयचे अध्यक्ष अजय चौधरी, शरद मोरे, वरुण जैन, प्रतीक शेठ, प्रमोद मेहलोत आदींची उपस्थिती होती.

=============

नेहरू यांची पुण्यतिथी साजरी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गुरुवारी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम नेहरू चौकात पार पडला. कार्यक्रमासाठी जे.डी. भालेराव, दिनेशे सोहे, रवींद्र जाधव, किरण सुरवाडे, नरेंद्र सपकाळे, चंद्रकांत अहिरे आदींची उपस्थिती होती.

==============

जिल्हाध्यक्षपदी जगदीश सोनवणे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्या पश्चिम जिल्हाध्यक्षपदी जगदीश ज्ञानेश्वर सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. निवड झाल्याबद्दल गणेश सोनवणे, भास्कर कोलटके, मंगल कांडेलकर, प्रशांत तराळे, प्रल्हाद सोनवणे, दीपक सोनवणे, संजय कांडेलकर आदींनी अभिनंदन केले आहे.