शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

जवानांनी केले सहकुटूंब श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 19:11 IST

एकीचे तुफान आलंया: जामद्यात पाणी फाऊंडेशनचा उपक्रम

चाळीसगाव: पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या जामदा गावात रविवारी जवानांनी सहकुटुंब श्रमदान करुन दुष्काळाविरुद्धची लढाई आम्ही जिंकणारच, असा मंत्र जागविला. यामुळे गावात रणरणत्या उन्हातही वेगळा उत्साह संचारला आहे.रविवारी जामदा गावातील २० सैनिकांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन सहकुटुंब श्रमदान केले. याबरोबरच उपक्रमात खारीचा वाटा म्हणून त्यांनी २१ हजाराची देणगीही दिली.देशाच्या सीमांवर शत्रुंशी दोन हात करणाऱ्या सैनिकांनी 'जय जवान...जय किसान' हा नाराच एकप्रकारे खरा करुन दाखविला. शेतकऱ्यांनी माणूस जगविण्याचे काम करावे. आम्ही शत्रुला इंचभरही पुढे सरकू देणार नाही, अशी भावना या स्पधेर्मुळे जागृत झाल्याची प्रतिक्रिया सैनिकांनी यावेळी व्यक्त केली. आम्ही देखील गावाला पाणीदार करण्यासाठी कंबर कसली असल्याचेही ते म्हणाले.गावचे भुमीपुत्र व उद्योजक ठाणसिंग पाटील यांनी देखील श्रमदान करून गावाला १५ हजार रुपयांची देणगी दिली. त्यांनी गावकºयांना या कामासाठी एकत्र येऊन श्रमदान करा असे आवाहनही केले. पाणी फाउंडेशन टिमच्या वतीने सर्व सैनिकांचा आणि कुटूंबियांचा टोपी - रूमाल देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आनंदसिंग राजपूत, अशोक अहिरे, बापू काकडे, रविंद्र सोनवणे, सुनिल पाटील, संतोष अहिरे, दीपक महाले, महेश मांडोळे, शिवाजी कोळी, रविंद्र माळी, गोपाल पाटील, अनिल पाचपुते, मुन्ना खाटिक, प्रकाश गोकुळ, अविनाश जाधव, हर्षल अहिरे, रमेश सावंत, विनोद अहिरे, रविंद्र माळी, श्रीकांत नवले आदी जवान उपस्थित होते. तालुक्याचे समन्वयक विजय कोळी, निलेश पगारे यांनी मार्गदर्शन केले.