शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटारींच्या मार्गदर्शनासाठी जपानचे पथक जळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 13:08 IST

वाघूर धरण, उमाळा जलशुध्दीकरण प्रकल्पाची पाहणी : पाणी पुरवठा, मलनिस्सारणासाठी मार्गदर्शन

ठळक मुद्दे१ डिसेंबरपर्यंत घेतील आढावाटोकीयोतील गटारींच्या धर्तीवर केले जाणार मार्गदर्शन
आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२८ - केंद्र शासनाच्या अमृत योजनेतंर्गत शहरात पाणीपुरवठा योजना, भुयारी गटारी व मलनिस्सारण योजनांना मंजुरी मिळाली आहे. या कामांना लवकरच मनपाकडून सुरुवात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या कामांसाठीच्या मार्गदर्शनासाठी शहरात जपानच्या चार सदस्यांचे पथक सोमवारी दाखल झाले. या पथकाकडून वाघूर धरण व उमाळा येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. मंगळवारीही या पथकाने काही ठिकाणांना भेटी दिल्या. जपान येथील ‘द जपान कौन्सिल आॅफ लोकल आॅथोरिटीज फॉर इंटरनॅशनल रिलेशन’ (क्लिअर) असे संस्थेचे नाव आहे. या पथकाकडून शहरातील विविध भागांमध्ये पाहणी करून अमृत योजनेतून होणाºया कामांबाबत मनपा प्रशासनाला काही तांत्रिक बाबतीत मार्गदर्शन केले जाणार आहे. उमाळा येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाची पाहणी पथकाने केली. यावेळी शहर अभियंता बी.डी.दाभाडे व प्रकल्प अभियंता योगेश बोरोले हे उपस्थित होते. १ डिसेंबरपर्यंत घेतील आढावाचार सदस्यांचे हे पथक शहरात १ डिसेंबरपर्यंत थांबणार असून शहरातील विविध भागात जावून पाणी पुरवठा योजना व भूमिगत गटारींच्या कामांची प्रभावी अंमलबजावणीबाबत आढावा घेतील. तसेच या पाहणीदरम्यान कोणत्या ठिकाणी भूमिगत गटार तयार करणे योग्य ठरेल याबाबतचे सर्व्हेक्षण देखील पथकाकडून करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा योजनांचा देखील अभ्यास देखील या पथकाकडून करण्यात येणार आहे. अमृत योजनेतंर्गत मलनिस्सारण व भूमिगत गटारींच्या कामांसाठी १३१ कोटी ५६ लाख तर पाणी पुरवठा योजनेसाठी १९१ कोटी ८६ लाख रुपयांची कामे होणार आहेत. टोकीयोतील गटारींच्या धर्तीवर केले जाणार मार्गदर्शनजपान येथील टोकीयो या शहरातील हे पथक असून, जगातील सर्वोत्तम भुयारी गटारींची सुविधा ही या शहराची मानली जाते. शहरात कितीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास शहरात कोणत्याही ठिकाणी पावसाचे पाणी तुंबत नाही. त्यामुळे जगातील बºयाचशा शहरांमध्ये नव्याने भुयारी गटारींचे काम केले जात असताना, टोकीयो येथील ‘ड्रेनेज सिस्टीम’चा अभ्यास केला जातो. जपानहून आलेल्या पथकाकडून देखील मनपाच्या अभियंत्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.