शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरला यंदा कापूस लागवड घटली, मका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 19:35 IST

कृषी विभागाचा पेरणी अहवाल : बोंडअळीने शेतकरी चिंतेत

जामनेर, जि.जळगाव : गेल्या वर्षी कापसाला मिळालेला कमी हमीभाव व बोंडअळीमुळे झालेले नुकसान यामुळे यंदा खरीप हंगामात तालुक्यात कापूस लागवड क्षेत्र तीन हजार हेक्टरने घटले आहे. याउलट मक्याची लागवड वाढली असल्याचे कृषी विभागाच्या पीक पेरणी अहवालावरून स्पष्ट होते. १२ जुलैपर्यंत ९८.४८ टक्के पेरण्या झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.महिन्यापासून होत असलेल्या पावसाने नदी, नाल्यांना पूर आलेले नसले तरी पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे.तालुक्याचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र १ लाख १ हजार ६६० हेक्टर आहे. १२ जुलैपर्यंत १ लाख ११२ हेक्टरवर लागवड झाली. ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तीळ व केळीच्या लागवडीत घट दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी केळी लागवड मोठ्या प्रमाणात होत असे. पुरेशा पाण्याअभावी केळीच्या लागवड क्षेत्रात घट होत असल्याचे दिसून येते. या हंगामात फक्त ९२३ हेक्टरमध्ये केळी लागवड झाल्याचे दिसत आहे. वाघूरच्या बँकवॉटर क्षेत्रात केळी लावली जात आहे.गळीत धान्यात वाढगळीत धान्याच्या लागवडीत यंदा चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. भुईमुगाचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र १२४ हेक्टर असून, यंदा ४४२ हेक्टरमध्ये लागवड झाली आहे. सोयाबीनचे लागवड क्षेत्र १३४८ असून, यंदा २७७६ हेक्टर लागवड झाली. कडधान्यात तूर लागवड वाढली आहे.गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात शेतातील विहिरींचे पाणी आटल्याने यंदा बागायती कापसाचे लागवड क्षेत्र घटले.दरम्यान, १३ जुलैपर्यंत तालुक्यात १५५.३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, पावसाची सरासरी टक्केवारी २१.५ इतकी आहे. गेल्यावर्षी ही टक्केवारी १५.८ होती.जामनेरला होत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आलेले नसले तरी पिकांची स्थिती समाधानकारक आहे.