शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर नगरपालिकेत विरोधकांचे नेतृत्व कुणाकडे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 16:18 IST

जामनेर नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

ठळक मुद्देसत्ताधारी भाजपाने ठेवला नाही नगरपालिकेत सक्षम विरोधकदोन वर्षापूर्वी भाजपाने केली नगरपालिकेत सत्ता हस्तगतपारस ललवाणी व संजय गरूड यांच्या भूमिकेकडे विरोधकांचे लक्ष

आॅनलाईन लोकमतजामनेर, दि.२० : नगरपालिकेत सक्षम विरोधकच सत्ताधारी भाजपाजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिल्लक ठेवला नसल्याची स्थिती असतांना आगामी नगरपालिका निवडणूक विरोधक कुणाच्या नेतृत्वाखाली लढतील याबाबत सध्या शहरात चर्चा सुरु आहे.जामनेर शहरात विविध अमिष दाखवून विरोधकांना जवळ करण्याची खेळी भाजपने दोन वषापूर्वीच खेळत पालिकेतील सत्ता हस्तगत केली आहे. ज्या विरोधकांच्या मदतीने सत्ता मिळविली त्यातील काहींना पालिकेबाहेर ठेवण्यात ते यशस्वी ठरले. यात अपात्र करण्यापर्यंत मजल गेली. विरोध करणाºयांची तोंड बंद करण्याचे कसबही भाजपाला अवगत असल्याने कुणी बोलतच नव्हते.२०१३ ची निवडणुक माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित लढत विजय मिळविला होता. त्यावेळी भाजपला मोठा धक्का बसला होता. पारस ललवाणी यांना नगराध्यक्षपद दिले गेले. सुरुवातीला आघाडीत आनंदी आनंद दिसत असला तरी ललवाणी यांना काम करीत असतांना त्यांचेच सहकारी सहकार्य देत नव्हते. यात जैन समर्थकच असल्याचा आरोपही केला गेला.एप्रिल २०१८ मध्ये होणारी निवडणुक काँग्रेस आघाडी कुणाच्या नेतृत्वाखाली लढेल हा प्रश्न आहे. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचेशी असलेली जवळीक पाहता त्यांचे समर्थक भाजप विरोधात लढतील या विषयी साशंकताच आहे. विरोधकांना एकत्र करुन निवडणुकीत उतरण्याचे कौशल्य पारस ललवाणी यांना दाखवावे लागेल. त्यांच्या भूमिकेकडे भाजप विरोधकांचे लक्ष लागले आहे. ललवाणी हे काँग्रेसचे कार्यकर्ते असून त्यांना राष्ट्रवादीचे संजय गरुड यांची साथ मिळत असल्याने निवडणूक लढण्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मदत मिळेलच.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षJamnerजामनेर