शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जळगावात सर्पमित्रांनी वर्षभरात वाचविले 944 साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 12:25 IST

नागपंचमी विशेष : शहरीकरणामुळे  सापांचा अधिवास धोक्यात 

ठळक मुद्देउंदरांचा नायनाट करणारा साप हा मानवाचा मित्र वाढत्या शहरीकरणामुळे  सापांचा अधिवास धोक्यातधोकेदायक असल्याच्या भावनेतून सापाला मारण्याचे प्रमाण वाढत आहे

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 -  शेतातील पिकांचे आणि अन्नधान्याचे नुकसान करणा:या उंदरांचा नायनाट करणारा साप हा मानवाचा मित्र असला तरी वाढत्या शहरीकरणामुळे  सापांचा अधिवास धोक्यात आला आहे. साप हा मानवासाठी धोकेदायक असल्याच्या भावनेतून सापाला मारण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र शेतक:यांसह संपूर्ण मानवासाठी साप वाचविणे गरजेचे ठरत आहे. याच विचारातून पुढाकार घेतलेल्या जळगावातील वन्य जीव संरक्षण संस्थेच्या कार्यकत्र्यानी वर्षभरात विविध जातीचे 944 साप वाचविले. जिल्ह्यात आढळणारे सर्पनाग, मण्यार, घोणस, फुरसे, धामण, दिवड, तस्कर, रुका सर्प, कवडय़ा, डुरक्या, धूळनागीण, कुकरी, अंडी खाणारे, रेती सर्प, मांज:या, गवत्या, अजगर. अशी घ्या काळजीकुटुंबातील लोकांना, पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढावे. स्वत: साप पकडण्याचा प्रय} करू नये. सापाला हुसकावून लावताना लांब काठी, तारेचा आकडा अशा गोष्टींचा वापर करून घरापासून लांब  सोडावे.भीतीने मृत्यू बिनविषारी सर्प चावल्याने कधीही मृत्यू येत नाही. केवळ सर्पाने आपल्याला चावा घेतला आणि आपला मृत्यू होणार या कल्पनेने मानसिक धक्का बसून बाधित व्यक्ती बेशुद्ध होते किंवा हृदयक्रीया बंद पडून  व्यक्तीचा मृत्यू होतो. जळगावातील वन्यजीव संरक्षण संस्थेच्यावतीने ऑगस्ट 2016 ते जुलै 2017 या वर्षभरात तब्बल 944 सापांना पकडून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले. 

या सापांना वाचविलेनाग - 233, मण्यार - 28, घोणस - 27, फुरसे - 3, धामण- 202, दिवड - 161, तस्कर - 73, रुका सर्प - 18,  कवडय़ा - 76, डुरक्या - 53, धूळनागीण - 36, कुकरी - 20, अंडी खाणारे- 1, रेती सर्प - 3, मांज:या - 4, गवत्या 3, अजगर- 3.धान्याचे 35 टक्के नुकसान उंदरामुळे होते. तसेच विविध आजारही उंदरांमुळेच होत असतात. उंदरांच्या संख्येवर सापामुळे नियंत्रण येते. त्यामुळे मानवाचा मित्र ठरणा:या सापाला वाचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्पमित्रांशी संपर्क साधून सापांना वाचविण्याचा प्रयत्न करा. -वासुदेव वाढे, वन्यजीव संरक्षण संस्था.