शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आदिशक्तीच्या स्वागतासाठी जळगावची बाजारपेठ फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 18:39 IST

खरेदीसाठी सकाळपासून गर्दी

ठळक मुद्दे मूर्ती खरेदीसाठी गुरुवारी गर्दी होणारघट विविध रंगातसकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20 - नवरात्रोत्सवास गुरुवारपासून प्रारंभ होत असून आदिशक्तीच्या स्वागतासाठी जळगावकर सज्ज झाले आहेत. विविध साहित्याच्या  खरेदीसाठी बुधवारी मंडळाचे कार्यकर्ते आणि भक्तगणांनी बाजारपेठ फुलली होती.   बुधवारी सानेगुरुजी रुग्णालयाच्या जागेवर  विविध साहित्यांची दुकाने थाटण्यात आली असून तेथे खरेदीसाठी उत्साह दिसून येत होता.  या ठिकाणी बुधवारी सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी झाली होती. संध्याकाळी त्यात आणखी भर पडली. त्यात संध्याकाली सहावाजेपासून पावसाला सुरूवात झाल्याने ग्राहकांसह विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली.  घटस्थापनेसाठी लागणारे लहान-मोठय़ा आकारातील घट बाजारात दाखल झाले असून त्यांची किंमत 30 ते 50 रुपये प्रति नग आहे. विशेष म्हणजे घट विविध रंगातदेखील आले आहेत. गुजराती बांधव जे घट स्थापन करतात त्यासाठी रंगीत घट वापरले जातात. त्यांना गरबा असे म्हटले जाते. काही मंडळ मोठे घट घेतात. या सोबतच मातीची धूपदाणी, दिवा या वस्तूही दाखल झाल्या आहेत. या सोबतच घट ज्यामध्ये स्थापन केला जातो त्या टोपलीचे भावदेखील चांगलेच वधारले आहे. या टोपल्यादेखील 30 ते 50 रुपये प्रति नग आहे. एरव्ही टोपली व केरसुणीचे भाव कमी असतात, मात्र नवरात्रीपासूनच त्यांचे भाव वाढू लागतात. लाल मदरा व त्यासोबत चमकीची झालर असलेले कापड, नारळ, घटाची तयार पूजा, पाच फळे, ङोंडूची फुले, नागवेलीची पानदेखील बाजारात उपलब्ध झाली होती.   बुधवारी दुपार्पयत अमावस्या असल्याने अनेकांनी मूर्ती घेणे टाळले. अमावस्या टाळून अनेकजण गुरुवारी सकाळीच मूर्ती खरेदी करणार असल्याने मूर्ती बाजारात आज काहीशी शांतता होती. घरी देवीची स्थापना करण्यासाठी लहान मूर्तीदेखील बाजारात आलेल्या आहे. विविध रुपातील लहान मोठय़ा मूर्ती 200 ते 500 रुपयांर्पयत उपलब्ध असून साडेतीन फुटार्पयतची मूर्ती 1000 ते 1100 रुपयांना आहे.