शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शित वा-यांचे प्रमाण वाढल्याने जळगावचा पारा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 15:35 IST

उत्तर भारतात यंदा पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाल्याने राज्यात पून्हा शितलहर पसरली आहे. १६ ते १७ अंशापर्यंत गेलेला जळगावचा रात्रीचा पारा पून्हा घसरायला सुरुवात झाली असून, थंडी चांगलीच झोंबायला लागली आहे.

ठळक मुद्देरात्रीचा पारा १३ अंशावर आठवड्याभरात थंडीची लाटथंड वारे व धुक्याचे प्रमाण वाढले

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.२५ -उत्तर भारतात यंदा  पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाल्याने  राज्यात पून्हा शितलहर पसरली आहे. आठवडाभरापासून १६ ते १७ अंशापर्यंत गेलेला जळगावचा रात्रीचा पारा पून्हा घसरायला सुरुवात झाली असून, थंडी चांगलीच झोंबायला लागली आहे. दरम्यान पुढील आठवड्यात जळगावचा पारा आणखीन घसरण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

यंदा थंडीचे प्रमाण कमी-जास्त प्रमाणात पहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिन्याचा पहिल्याच आठवड्यात जळगावचा पारात १२ अंशापर्यंत आला होता. मात्र त्यानंतर पून्हा तापमानात वाढ झाली होती. मात्र गेल्या आठवड्यात कश्मिर, हिमाचल प्रदेशच्या काही भागात बर्फवृष्टी झाल्याने राजस्थान, मध्यप्रदेशसह महाराष्टÑात देखील उत्तरेकडील शित वाºयांमुळे थंडी वाढली आहे.

पारा आणखीन घसरणारदरम्यान, आठवड्याभरात उत्तरेकडून येणाºया थंड वा-यांचे प्रमाण वाढल्याने जळगावच्या पारा आणखीन घसरण्याचा अंदाज आहे. जळगावचे किमान तापमान ११ ते १२ अंशापर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच शनिवारी राज्यात सार्वाधिक कमी तापमान १२ अंश नाशिक शहराचे होते. त्याखालोखाल १३ अंश जळगावच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. महाबळेश्वरचे तापमान १५ अंश, तर अहमदनगरचे तापमान १५.७ अंश इतके होते.

थंड वारे व धुक्याचे प्रमाण वाढलेशुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी वातावरणात काही प्रमाणात धुके पहायला मिळाले. तसेच वाºयांचा वेग देखील वाढला होता. जळगावात ७ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने थंडी चांगलीच बोचत होती.पारा घसरल्याने हरभरा, गहू या रब्बी पिकांना देखील फायदा होत आहे. पुढील आठवड्यात जरी पारा घसरणार असला तरी मात्र डिसेंबर महिन्याचा पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात जळगावात पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

मॉर्नींग वॉकसाठी गर्दी वाढलीहिवाळा म्हटला की, आरोग्यासाठी हितवर्धक असतो. त्यामुळे सकाळच्या वेळेस व्यायाम करणाºयांचा संख्येत देखील वाढ झालेली दिसुन येत आहे सकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावर मॉर्नींग वॉक साठी येणाºयांची गर्दी वाढत आहे. तसेच विविध आरोग्यवर्धक काढा विक्री करणाºयांची वर्दळ देखील पहायला मिळत आहे. तसेच वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकल्याचा रुग्णांमध्ये वाढ झाली असून रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहेत.ात बर्फवृष्टी झाल्याने राजस्थान, मध्यप्रदेशसह महाराष्टÑात देखील उत्तरेकडील शित वाºयांमुळे थंडी वाढली आहे.