शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांच्या टोळक्यातून शोधले ‘अलीबाबा चालीस चोर’; ४० जणांना बजावल्या नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2023 15:31 IST

एक वर्ष मुदतीचे प्रतिज्ञापत्र भरुन घेणार

कुंदन पाटील

जळगाव : वाळूतस्करी उघड केल्यानंतर कायदेशीर कारवाई करुनही अनेक जण पुन्हा या धंद्यात पाय पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जळगाव तहसीलदारांनी वाळू चोरीची सवय जडलेल्या ४० जणांना फौजदारी स्वरुपाची नोटीस बजावली आहे. त्यानुसार या ४० जणांना १० हजारांच्या शपथपत्रावर यापुढे अवैध वाळू उचल करणार नसल्याचे लिहून द्यावे लागणार आहे.

जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांनी गतकाळात वाळूतस्करीत सातत्याने सहभागी असणाऱ्या आरोपींची ‘कुंडली’ काढली. कारवाई करुनही सातत्याने वाळू चोरी करणाऱ्या ४० जणांचा त्यात सहभाग दिसून आला. या ४० जणांच्या मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदारांनी फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार नोटीस बजावली आहे.

शपथपत्र लिहून घेणारया ४० जणांकडून १० हजारांच्या शपथपत्रावर वर्षभरासाच्या मुदतीसाठी शपथपत्र भरुन घेण्यात येणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार १९७३ चे कलम १०७ नुसार तहसीलदार ४० जणांविरोधात प्रक्रिया पार पाडणार आहेत. त्यानुसार त्यांना मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत ४० जणांना शपथपत्र सादर करावे लागणार आहे.

वाळूचा सातत्याने अवैध उपसा करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु पाहणाऱ्या ४० जणांविरोधात फौजदारी संहितेनुसार कारवाई करण्यात येत आहे. शपथपत्र दिल्यानंतरही या गैरप्रकारात त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. -नामदेव पाटील, तहसीलदार