शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात शिक्षकांसाठी विद्याथ्र्याची ‘पतेती’ची सुट्टी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 13:25 IST

‘रोझलॅण्ड’ प्रशासनाचा फतवा : पालकांकडून नाराजी

ठळक मुद्देशिक्षकांचे वैयक्तीक कामशासकीय निर्णय डावलून सुट्टीच्या दिवशी शाळा घेण्याचा फतवा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17 -  शहरातील सर्व खासगी व शासकीय शाळांना गुरुवारी पतेती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आपल्या शासकीय कामांमुळे शिक्षकांना शाळेत यावे लागणार असल्याने पतेतीची सुट्टी वाया जावू नये म्हणून विद्याथ्र्याचीही सुट्टी रद्द करून गुरुवारी शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय शहरातील रोझलॅण्ड इंग्लिश स्कूलने घेतला आहे. शाळेच्या या निर्णयाविरोधात पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी सर्व शाळांना ‘पतेती’ची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र शहरातील रोझलॅण्ड शाळा प्रशासनाने शासकीय निर्णय डावलून सुट्टीच्या दिवशी शाळा घेण्याचा फतवा काढला आहे. शिक्षकांच्या कामामुळे विद्याथ्र्याची सुट्टी रद्द करण्याचा संबध  काय? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शाळेतील मराठी व इंग्लिश मिडियमच्या शिक्षकांचे गुरुवारी शालेय काम आहे. त्यामुळे गुरुवारी सुट्टी असतानाही शिक्षकांना शाळेत यावे लागत असल्याने शिक्षकांची सुट्टी वाया जाणार होती. त्यामुळे पतेतीची सुट्टी रद्द करून ही सुट्टी पुढील इतर दिवशी घेण्याची मागणी शिक्षकांनी केली होती. त्यानुसार संस्थाध्यक्ष व मुख्याध्यापकांनी ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती  सुत्रांनी दिली आहे.शासनाकडून दरवर्षी सुट्टय़ांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत असते. त्या सुट्टय़ांसह शिक्षण विभागाकडून देखील 14 सुट्टय़ा जाहीर केल्या जात असतात. तसेच या सुट्टय़ा घेणे हे प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे.मात्र रोझलॅण्ड शाळा प्रशासनाकडून या निर्णयाला हरताळ फासण्यात आला आहे. अनेक पालकांना देखील शासकीय सुट्टी असल्याने बेत आखण्यात आले होते. मात्र शाळा प्रशासनाने सुट्टीच रद्द केल्याने पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच रिक्षाचालकांनी देखील शाळा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 

शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सुट्टय़ा या शाळा प्रशासनाने घेतल्याच पाहिजे. शाळा प्रशासनाकडून सुट्टी रद्द केल्यास संबधित शाळांवर कारवाई करण्यात येईल.-देवीदास महाजन, शिक्षणाधिकारी, 

शाळेने पतेतीची सुट्टी रद्द केलेली नाही. फक्त ती सुट्टी गुरुवारी न घेता इतर दिवशी घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी देखील अशा प्रकारे निर्णय घेण्यात आला होता. याबाबत तुम्हीच संस्थाध्यक्षांशी चर्चा करा.  -मिनाक्षी पाटील, मुख्याध्यापिका,रोझलॅण्ड स्कूल