शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: चांदीला चकाकी, आठवडाभरात ३३०० रुपयांची वाढ, सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार

By विजय.सैतवाल | Updated: August 26, 2023 17:55 IST

Jalgaon: गेल्या तीन आठवड्यांपासून ७० ते ७२ हजार रुपयादरम्यान असलेल्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ होत जाऊन आठवडाभरात ती तीन हजार ३०० रुपयांनी वधारली आहे.

- विजयकुमार सैतवालजळगाव  -  गेल्या तीन आठवड्यांपासून ७० ते ७२ हजार रुपयादरम्यान असलेल्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ होत जाऊन आठवडाभरात ती तीन हजार ३०० रुपयांनी वधारली आहे. त्यामुळे चांदीचे भाव ७४ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू असून ते पुन्हा ५९ हजार रुपयांच्या पुढे जात ५९ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. 

अधिक मास सुरू झाल्यानंतर सोने-चांदीच्या भावात वाढ झाली होती. त्यानंतर मात्र अधिक महिना संपताच त्यांचे भाव कमी झाले. चांदीचे भाव तर ७ ऑगस्टपासूनच कमी होत जाऊन ते ७० हजार २०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी त्यात एक हजार रुपयांची वाढ झाली व चांदी ७१ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली. त्यानंतर किरकोळ चढ-उतार होत राहिला. मात्र २२ ऑगस्ट रोजी चांदीत थेट एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली व ती ७२ हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहचली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली. तसेच २४ ऑगस्ट रोजी पुन्हा एक हजार ४०० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे भाव ७४ हजार ४०० रुपये प्रति किलो झाले. २५ ऑगस्ट रोजी ४०० रुपयांची घसरण झाली मात्र २६ ऑगस्ट रोजी पुन्हा ३०० रुपयांची वाढ झाल्याने ती ७४ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचली.

दुसरीकडे मात्र सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू आहे. गेल्या आठवड्यात सोने ५९ हजार रुपयांच्या खाली येऊन ५८ हजार ८०० रुपये प्रति तोळा झाले होते. मात्र २२ रोजी त्यात २०० रुपयांची वाढ झाली. तसेच २४ ऑगस्ट रोजी पुन्हा १०० रुपयांची वाढ होऊन ते ५९ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. तीन दिवसांपासून सोने याच भावावर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने चांदीच्या भावात वाढ झाली असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

टॅग्स :SilverचांदीMarketबाजार