शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कचराकोंडीला ‘सुकृती’ने दिली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 12:39 IST

स्तुत्य उपक्रम : महिनाभरात 350 क्विंटल कचरा केला गोळा

ठळक मुद्दे अपार्टमेंटमध्येच गोळा केला ओला व सुका स्वतंत्र्यरित्या कचरा कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र्य कचराकुंडय़ाओल्या कच:यापासून करणार अपार्टमेंटमध्येच खतनिर्मिती43 कुटुंबांनी उभा केला आदर्श !

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20 -  ज्या ठिकाणाहून कचरा निर्माण होतो, त्या ठिकाणापासूनच ओला व सुका कचरा वेगळा करीत त्यांची योग्य विल्हेवाट लावली तर पर्यावरण रक्षणास किती हातभार लागू शकतो, याचा आदर्श जळगावमधील द्रौपदीनगरातील सुकृती रेसीडेन्सीच्या रहिवाशांनी उभा केला आहे.   एक महिन्यापूर्वीच सुरू केलेल्या या आगळ्य़ा-वेगळ्य़ा उपक्रमातून दीडशे क्विंटल सुका तर 200 क्विंटलच्यावर ओल्या कच:यांची स्वत: योग्य विल्हेवाट लावली आहे. सध्या प्रत्येक शहरात कच:याची मोठी डोकेदुखी वाढली आहे. त्यात ओला व सुका कचरा एकत्र झाला तर त्याची विल्हेवाट लावण्यास मोठी अडचण येते व तो कुजून शहरवासीयांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारे जळगावातही ही समस्या असल्याने यावर किमान खारीचा वाटा घेत पर्यावरण रक्षणासाठी कॉन्फेडेरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) ही बांधकाम संघटना व अरिहंत डेव्हलपर्स हे संयुक्तपणे सरसावले आहेत. यासाठी क्रेडाईच्या राज्यस्तरीय व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिश शहा यांनी द्रौपदीनगरातील सुकृती रेसीडेन्सीपासून या उपक्रमाला सुरुवात केली. कच:यासाठी कोडसुकृती रेसीडेन्सी या ठिकाणी तीन इमारती असून त्यात एकूण 43 कुटुंब राहतात. येथे निघणारा कचरा त्याच ठिकाणी वेगवेगळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी रहिवाशांनीही पुढाकार घेतला. यात क्रेडाई संघटनेमार्फत ओला कचरा टाकण्यासाठी हिरव्या रंगाची कचराकुंडी तर सुका कचरा टाकण्यासाठी निळी कचराकुंडी प्रत्येक घरासमोर ठेवण्यात आली. त्यानुसार येथील रहिवासी याच ठिकाणी कचरा वेगवेगळा टाकतात. मनपा कर्मचा:यासाठी रंगाची ओळखया ठिकाणी ठराविक वेळेत महापालिकेची घंटागाडी कचरा उचलण्यासाठी येते. या घंटागाडीचा कर्मचारी प्रत्येक घरोघर जाऊन कचरा गोळा करतो. विशेष म्हणजे कचरा गोळा करण्यासाठी या कर्मचा:यालादेखील निळ्य़ा व हिरव्या रंगाची मोठी कचराकुंडी देण्यात आली आहे. त्यात वेगवेगळा कचरा गोळा करून त्याची वेगवेगळी विल्हेवाट लावतो. कच:याची योग्य विल्हेवाटमहिन्याभरापूर्वीच सुरू केलेल्या या उपक्रमास येथील रहिवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून सर्व रहिवाशांनी मिळून महिनाभरात 150 क्विंटल सुका व 200 क्विंटलच्यावर ओला कचरा वेगवेगळा गोळा केला. यामुळे या कच:यांची योग्य विल्हेवाट लागण्यास मदत झाली. झाडांसाठी खत निर्मिती करणारया पुढचे पाऊल म्हणजे आता हा कचरा बाहेर न जाता त्याच ठिकाणी ओल्या कच:यापासून बायोगॅस अथवा खत निर्मिती करण्याचा मनोदय अनिश शहा यांनी व्यक्त केला. हे खत झाडांना देण्यासही मदत होईल व महापालिकेचाही भार कमी होईल, या उपक्रमास इमारतीमधील विठ्ठल काबरा, अॅड. राजेंद्र येवले, संदीप पाटील, चंद्रकांत जैन, के.जी. चौधरी, अॅड. बन्सीलाल महाजन यांच्यासह सर्वच रहिवासी हातभार लावत आहे. 

सध्या कच:याची समस्या गंभीर असल्याने प्रत्येकाने ओला व सुका कचरा वेगवेगळा केला तर पर्यावरण रक्षणास हातभार लागू शकतो. या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्यास रहिवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. - अनिश शहा, सदस्य, राज्यस्तरीय व्यवस्थापन समिती, क्रेडाई