शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्‍यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस ...

जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्‍यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्‍यात आला. याप्रसंगी मनोज चौधरी, प्रमोद घुगे, भिकन सोनवणे, सागर कुटुंबळे व पदाधिकारी उपस्थित होते.

===================

दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र व निसर्ग मित्र समिती (फोटो)

दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र व निसर्ग मित्र समितीतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. निसर्ग मित्र समितीच्या उपाध्यक्षा रुपाली वाघ यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी वासुदेव पाटील, अक्षय सोनवणे, निसर्ग मित्र समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, विकास वाघ आदी उपस्थित होते.

===================

प्रगती शाळा (फोटो)

प्रगती शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच बाबासाहेबांचे विचार व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती ओसवाल यांनी दिली. मंगला दुनाखे व सचिन दुनाखे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात शोभा फेगडे, मनोज भालेराव व ज्योती बागुल, मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संध्या अट्रावलकर तर आभार भाग्यश्री तळेले यांनी मानले.

==================

आर.आर. विद्यालय

आर.आर. विद्यालयात ज्येष्ठ शिक्षक के.टी.वाघ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कैलास वाघ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. याप्रसंगी प्रभारी मुख्‍याध्यापक संजय पिले, डी.टी.पाटील आदींची उपस्थिती होती.

=================

देवकर प्राथमिक विद्यालय

सु.ग.देवकर प्राथमिक विद्यालयात मुख्‍याध्‍यापिका साधना महाजन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्‍यात आले. याप्रसंगी योगेश वंजारी यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने दिली. शिक्षकवृंद कार्यक्रमात उपस्थित होते.

================

अभिनव प्राथमिक विद्यालय

अभिनव प्राथमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्‍यात आली. अध्‍यापिका विद्यालयाच्या प्राचार्या चौधरी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. तर जागृती भोळे यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्याची माहिती उपस्थितांना दिली. सूत्रसंचालन चेतन लोहार यांनी केले. यशस्वीतेसठी प्रवीण वायकोळे, उमेश चौधरी, प्रवीण महाले यांनी परिश्रम घेतले.

===============

मातोश्री जैन विद्यालय

मातोश्री प्रेमाबाई जैन विद्यालयात मुख्‍याध्‍यापक गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने बाबासाहेबांच्या जीवन कार्याची माहिती देण्‍यात आली. तर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध, काव्यवाचन आणि चित्र स्पर्धा घेण्‍यात आली. यात प्रणाली गायकवाड, वैष्णवी निकुंभ, प्रशांत कवळे, जयेश बाविस्कर आदींनी यश मिळविले. तसेच रितेश शिरसाठ, सौरभ पाटील, प्रणाली गायकवाड, दीपा गुप्ता, वैष्णवी निकुंभ, जयेश बाविस्कर, संदेश तिवारी, सानिया तिवारी यांनी भाषणे केली.

================

सुजय महाजन विद्यालय

सुजय महाजन महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्‍यात आली. यावेळी मुख्‍याध्‍यापिका अर्चना सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्‍यात आले. नंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवन कार्याची माहिती देण्‍यात आली. तसेच विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्‍यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हितेश पाटील, मुक्ता देशमुख, पूजा तवटे यांनी मार्गदर्शन केले.

================

रत्ना जैन विद्यालय

रत्ना जैन प्राथमिक विद्यालयातील स्व.शेठ भिकमचंद जैन सभागृहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्‍याध्यापिका आशा साळुंखे यांनी प्रतिमेचे पूजन केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

================

महात्मा गांधी विद्यालय

भादली बुद्रुक येथील महात्मा गांधी विद्यालयात ग्रामपंचायत सदस्य अरुण सपकाळे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे जयंतीनिमित्त पूजन करण्‍यात आले. यावेळी मुख्‍याध्‍यापक आर.के.तायडे, सुकदेव सपकाळे, रितेश सपकाळे, राजाराम चौधरी, राजेंद्र चौधरी, सुनील भोळे, भगवान कोळी, गोपाळ ढाके, डी.के.धनगर, के.डी.रडे, शुभांग पाटील, आर.जी.नारखेडे आदींची उपस्थिती होती.

===============

जय दुर्गा विद्यालय

जय दुर्गा प्राथमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्‍यात आली. याप्रसंगी मुख्‍याध्यापक सागर कोल्हे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्‍यात आले. ज्येष्ठ शिक्षिका ज्योती पाटील यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्‍यात आली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला.

==============

कमल राजाराम वाणी विद्यालय

कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यालयात मुख्‍याध्‍यापक डॉ. रवींद्र माळी, नीलेश नाईक यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्‍यात आले. यावेळी इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, वेशभूषा, घोषवाक्ये, निबंध, चित्रकला आदी स्पर्धा घेण्‍यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रशिदा तडवी यांनी केले. यशस्वीतेसाठी नरेंद्र वारके, वंदना नेहते, उज्ज्वला जाधव, राहुल धनगर, श्रीकांत पाटील, सुवर्णा सोनार, छाया पाटील, भूषण बऱ्हाटे आदींनी परिश्रम घेतले.