शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विशेष उत्सव गाड्यांमुळे जळगाव रेल्वे स्टेशनला सव्वा कोटींची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:16 IST

कोरोनामुळे गेले काही महिने बंद असलेली रेल्वेसेवा, अनलाॅकच्या पाचव्या टप्प्यानंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष प्रवासी ...

कोरोनामुळे गेले काही महिने बंद असलेली रेल्वेसेवा, अनलाॅकच्या पाचव्या टप्प्यानंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष प्रवासी गाड्यांसह विशेष उत्सव गाड्यादेखील रेल्वेतर्फे सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गाड्यांना जनरल तिकिटे देण्याची सुविधा न ठेवता, फक्त तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वे गाडीत प्रवेश देण्यात येत आहे. दसरा, दिवाळीपासून सुरू केलेल्या या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, सध्या नाताळ सणानिमित्तही या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. जळगाव स्टेशनवरून या विशेष उत्सव गाड्यांना भरघोस उत्पन्न मिळाले असून, गेल्या महिन्यात ३२ हजार ३७५ प्रवाशांनी तिकीट खिडकीवर तिकीट काढले होते. यातून रेल्वेला एक कोटी ३२ लाख ६१ हजार ८८५ इतकी कमाई झाली आहे.

इन्फो :

कमी गाड्यांमुळे तिकीट आरक्षित होईना :

सध्या रेल्वेतर्फे विशेष गाड्या आणि विशेष उत्सव प्रवासी गाड्या सुरू असल्या तरी, या गाड्यांची संख्या अपूर्ण असल्यामुळे, तिकीट आरक्षित होत नसल्याच्या प्रवाशांतर्फे तक्रारी करण्यात येत आहेत. चार ते आठ दिवस आधी तिकीट बुकिंग करूनही, आरक्षित होत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच रेल्वेत तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश मि‌ळत असल्यामुळे, प्रवाशांना नाइलाजस्त तिकीट रद्द करावे लागत आहे. त्यामुळे आतापर्यंत जळगाव स्टेशनवरून चार हजार २६८ प्रवाशांनी तिकीट रद्द केले असून, यातून १८ लाख ३८ हजार ६९८ रुपयांचा परतावा प्रवाशांना देण्यात आला आहे.

इन्फो :

जनरल तिकीट मात्र बंदच :

सध्या सुरू असलेल्या गाड्यांमध्ये तिकीट खिडकीवरून तात्काळ जनरल तिकीट काढून, प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पाचोरा, चाळीसगाव, नाशिक या ठिकाणी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची व चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट सुरू करण्याची मागणी विविध प्रवासी संघटनांतर्फे करण्यात येत आहे.

इन्फो :

सध्या सुरू असलेल्या विशेष गाड्या व उत्सव गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांचे तिकीट लवकर आरक्षित होत नाही. मात्र, टप्प्याटप्प्याने जसजशी गाड्यांची संख्या वाढेल, त्यावेळी प्रवाशांची गैरसोय दूर होईल.

युवराज पाटील, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, भुसावळ रेल्वे विभाग