शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील चिमुकले राममंदिरात पोलिसांमध्ये फ्री स्टाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 12:29 IST

साहित्य ठेवण्यावरुन वाद : गुन्हा दाखल नाही

ठळक मुद्देपरस्परविरोधी तक्रारसकाळी उफाळला वादगुन्हा दाखल नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13 -   चिमुकले राम मंदिरात पुजेचे साहित्य ठेवण्याच्या कारणावरुन सहायक फौजदार नामदेव बाबुराव ठाकरे, पोलीस कर्मचारी गोपीचंद पाटील व राजू देवराम शिंदे यांच्यात शनिवारी सकाळी साडे आठ वाजता मंदिराच्या आवारातच फ्री स्टाईल झाल्याची घटना घडली आहे. पाटील व शिंदे यांनी जीवे ठार मारण्याचा प्रय} केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.ठाकरे हे पोलीस मु्ख्यालयात कार्यरत आहेत. चिमुकले राममंदिरात ते दररोज सकाळी दर्शनासाठी जातात. नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी दर्शनाला गेले असता तेथील ट्रस्टी पोलीस कर्मचारी गोपीचंद पाटील यांनी त्यांना पुजेचे साहित्य मंदिरात ठेऊन जायचे नाही असे सांगितले. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. रात्रपाळीला असलेल्या निंबा महाजन या कर्मचा:यानेही त्यांना ट्रस्टींचा तसा निरोप दिला. त्यामुळे ठाकरे यांनी साहित्य उचलून घेतले.ठाकरे यांनी तक्रार दिल्यानंतर ट्रस्टी गोपीचंद पाटील यांनीही जिल्हा पेठ पोलिसांकडे ठाकरे यांच्याविरुध्द तक्रार अर्ज दिला आहे. राम मंदिरावर पोलीस कर्मचारी ट्रस्टी आहेत. ठाकरे हे सरकारी पेटी या मंदिरात ठेवतात व तिथेच अंघोळही करतात. त्यामुळे त्यांना विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण करायला सुरुवात केली असे पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, दोघांचे अर्ज घेण्यात आले असले तरी गुन्हा दाखल झालेला नाही.

ठाकरे हे शनिवारी सकाळी पुन्हा मंदिरात गेले असता तेथे गोपीचंद पाटील व राजू शिंदे यांच्याशी त्यांचा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की सर्व जण एकमेकाच्या अंगावर धावून गेले. पाटील व शिंदे या दोघांनी नरडी दाबून जीवे मारण्याचा प्रय} केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. या वादानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याकडे फिर्यादच लिहून दिली, मात्र गायकवाड यांनी हा अदखलपात्र गुन्हा आहे असे सांगून हाकलून लावल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. अमळनेरच्या वादामुळे गायकवाड यांनी तक्रार घेतली नाही असाही आरोप त्यांनी केला.दरम्यान, ठाकरे हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे.

ठाकरे यांची सरकारी पेटी मंदिरात होती, ती ठेवू नये म्हणून ट्रस्टींनी विरोध केला होता. दोघांचे एकमेकाच्याविरुध्द अर्ज आले आहेत. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. पोलीस अधीक्षकांनाही त्याचा अहवाल पाठविणार आहे.               -सुनील गायकवाड, पोलीस निरीक्षक