शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
9
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
10
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
11
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
12
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
13
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
14
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
15
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
16
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
17
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
18
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
19
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
20
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

जळगाव मनपाच्या आरोग्याधिका:यांची सेवा समाप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:28 IST

जंतूनाशके खरेदीसह शहरातील आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल तब्बल अर्धातास सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या

ठळक मुद्देउदय पाटील यांच्याकडे कार्यभारचौकशी करून फौजदारी गुन्हासर्वपक्षीय संतप्त

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 9 - आधी खरेदी नंतर कार्याेत्तर मंजुरी या सारखे गंभीर प्रकार 23 लाखाच्या जंतूनाशके खरेदीत आढळून आल्याने महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांना तडकाफडकी सेवामुक्तीचा निर्णय महापालिकेच्या महासभेत बुधवारी घेण्यात आला. या प्रकाराची चौकशी करून संबंधीतांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचेही यावेळी झालेल्या गरमागरम चर्चेत ठरले. महापालिकेची विशेष महासभा महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिण्यात आली होती. उपमहापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, नगरसचिव अनिल वानखेडे आदी प्रमुख उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या खरेदीवरून विषय तापलास्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासन निर्देशानुसार 14 व्या वीत्त आयोगाच्या प्राप्त निधीतून आरोग्य विभागासाठी व्हॅक्युम एम्टीयर 4 नग, अत्याधुनिक व्हॅक्युम 1 व रॉडींग मशिन 1, साफ सफाई साहित्य, 1 ते 37 वॉर्डामधील 150 कचरा कंटेनर, फिरते शौचालय 2 नग, 6 ट्रॅक्टर ट्रालिसह व 1 रोबोटीक जे.सी.बी. मशिन खरेदी करण्याचा निर्णय सभेत चर्चेसाठी येताच सदस्य संतप्त झाले. नगसेवक नितीन लढ्ढा यांनी हा विषय मांडताना सांगितले की, आरोग्य विभागाने 23 लाख 70 हजार रुपये खर्च करून फेब्रुवारी महिन्यात खरेदी केलेले जंतू नाशके व दरुगधी नाशके पडून असून पाच महिन्यात केवळ 300 लीटर हे रसायन वापरले गेले. तब्बल 1700 लीटर रसायन धूळखात पडून असल्याची धक्कादायक माहिती मनपा स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके व नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी या ठिकाणी दिलेल्या भेटीत समोर आली  होती. हा प्रकार अत्यंत गंभीर असून याप्रश्नी कडक कारवाई करणे आवश्यक आहे. मागची ट्रॅक्टर खरेदी 11 महिने कशी लांबलीयापूर्वी महापालिकेने ट्रॅक्टर खरेदीसाठी जी निविदा प्रक्रिया राबविली ती तब्बल 11 महिने लांबली. बाराव्या महिन्यात ट्रॅक्टर आले, हा प्रकार संशयास्पद होता,असेही बरडे म्हणाले. स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके, सभागृह नेता रमेशदादा जैन, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजपाचे पृथ्वीराज सोनवणे, रवींद्र पाटील यांच्यासह अन्य नगरसेवकांनी आरोग्य विभागातील गलथान काराभाराचा कडक शब्दात समाचार घेतला. ही रसायने नाशिकच्या मक्तेदाराकडून खरेदी केली गेली. त्यामुळे यामागे केवळ डॉ. विकास पाटील आहेत की अन्य कोणी, नाशिकचा ठेकेदार नेमका कुणाचा अधिकारी याचीही चौकशी व्हावी,   अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. जंतूनाशके खरेदीसह शहरातील आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल तब्बल अर्धातास सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. आरोग्य विभागाने आरोग्य विभागाने 23 लाख 70 हजार रुपये खर्च करून खरेदी केलेल्या जंतूनाशके व दरुगधी नाशके खरेदी व्यवहाराची चौकशी केली जावी, तत्पर्वी आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांची मनपातील सेवा समाप्त केली जावी, चौकशीत ते व अन्य कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी भूमिका सभागृह नेते रमेशदादा जैन यांनी मांडली.कैलास सोनवणे यांनी या संदर्भात मांडलेल्या प्रस्तावाचा ठराव करावा असेही ते म्हणाले. डॉ. विकास पाटील यांची मनपातील सेवा समाप्त करून त्यांच्या जागी प्रभाग समिती क्रमांक 2 चे अधिकारी उदय पाटील याच्याकडे कार्यभार सोपविला जावा असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.