शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा कर्मचा:यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा

By admin | Updated: May 20, 2017 18:03 IST

आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकासह तिघांना निलंबित केले

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 20 - शहरातील शिवाजीनगर भागात सफाईच्या कामात कसूर आढळल्याने मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकासह    तिघांना निलंबित केले असून  आयुक्तांनी आरोग्य कर्मचा:यांची बाजू ऐकून न घेता कारवाई केली, आरोग्य कर्मचा:यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी आरोग्य कर्मचा:यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. निलंबन रद्द न केल्यास आरोग्य कर्मचा:यांनी सामूहिक रजा व राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी सकाळी शिवाजीनगर भागात मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत कहार व मनपा आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी सकाळी केलेल्या पाहणीत या भागात घाणीचे साम्राज्य आढळून आले. त्यानुसार मनपा आयुक्तांनी मनपाच्या तीन कर्मचा:यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या कारवाई विरोधात आरोग्य विभागातील  अधीक्षक, सहाय्यक निरीक्षक व मुकादमांमध्ये संताप निर्माण झालेला आहे. यामुळे शनिवारी या कर्मचा:यांनी महापौर, उपमहापौर व आयुक्तांना निवेदन देवून ही कारवाई चुकीची  असल्याचे म्हटले आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी प्रामाणिक काम करीत असताना तसेच कुठलाही दोष नसताना निलंबन व दंडाची कारवाई प्रशासनाकडून केली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आरोग्य कर्मचा:यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या स्वच्छतेसाठी 970 झाडू कामगार, 2 हजार 106 गटार कामगार व 160 कचरा वाहनांवरील कर्मचारी अशा 3 हजार 236 कामागारांचे आवश्यकता आहे. मात्र शहरात सध्या 925 जणांकडून हे काम करुन घेतले जात आहे. यामुळे शहराची  100 टक्के स्वच्छता करणे अशक्य असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.