शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे जळगाव मनपाला मिळणार 85 कोटी

By admin | Updated: May 22, 2017 12:36 IST

एलबीटी उत्पन्न वाढीकडे दुर्लक्षामुळे मनपाचे नुकसान होणार

 जळगाव,दि.22 - शासनाने जीएसटी लागू करण्यासाठी एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे महापालिकांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका परावलंबी होणार असून त्यांना उत्पन्न वाढीसाठी संधी उरलेली नाही. जळगाव मनपाला एलबीटीचे अनुदान तसेच 50 कोटीच्यावरील एलबीटी व मुद्रांक शुल्क या सगळ्यापोटी मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन दरवर्षी सुमारे 80 ते 85 कोटींच्या आसपास अनुदान मिळणार असल्याचा अंदाज महापौरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. 

शासनाने करप्रणालीत एकसुत्रता यावी यासाठी जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनपा क्षेत्रात लागू असलेली एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एलबीटी महापालिकांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत होता. शासनाने यापूर्वीच 50 कोटीच्या आतील उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच वेळी तेव्हाच्या एलबीटी उत्पन्नावरून मनपाला अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्याआधी तत्कालीन आयुक्तांनी एलबीटी उत्पन्न वाढीकडे पूर्णपणे दूर्लक्ष केल्याने मनपाला त्याचा फटका बसला  होता. शासनाकडून मिळणारे अनुदान तसेच 50 कोटीच्या वर उलाढाल असलेल्या व्यावसायिकांकडून मिळणारे एलबीटीचे उत्पन्न व मुद्रांक शुल्क असे मिळून सुमारे 80 ते 85 कोटींच्या आसपास उत्पन्न मनपाला मिळत आहे. वास्तविक जळगावची बाजारपेठ लक्षात घेता हे उत्पन्न 100 ते 125 कोटींच्या आसपास मिळणे अपेक्षित होते. त्यामुळे आता शासनाकडून या 80-85 कोटीच्या उत्पन्नाइतकेच अनुदान मनपाला मिळणार आहे. त्याचा मोठा फटका मनपाला बसला आहे. तसेच दरवर्षी त्यात केवळ 8 टक्के वाढ होणार आहे. तसेच हे अनुदान वेळेवर न मिळाल्यास मनपाला दैनंदिन कामकाज करणेही अवघड  होणार आहे.