शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचा खून करुन लांबवलेली चारचाकी सापडली जळगावात

By admin | Updated: July 15, 2017 12:43 IST

औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखा व सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवित गाडीचा छडा लावत

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 15 - औरंगाबाद येथून चारचाकी भाडय़ाने करून औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील पालोद फाटय़ाजवळ धारदार शस्त्राने वाहन चालकाचा खून केला. त्यानंतर मृतदेह रस्त्यावर फेकत चारचाकी लांबविल्याची धक्कादायक घटना 14 रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली़ औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखा व सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवित गाडीचा छडा लावत ही गाडी शुक्रवारी सायंकाळी जळगावातून ताब्यात घेतली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील इमरान खान समंदर खान यांच्या मालकीची चारचाकी( एम़एच 19 ई़ई़ 3481) ही गाडी आह़े त्यावर चालक म्हणून शेख शकील शेख शब्बीर (वय-32, रा़नाटेगाव़जि़ औरंगाबाद) कामाला आह़ेशेगावसाठी भाडय़ाने केली गाडीऔरंगाबाद-शेगावसाठी भाडय़ाने नेहरु चौकात सापडली चारचाकीमोबाईल लोकेशननुसार आरोपींच्या पाठलाग करीत पोलिसांना गाडी जळगावातील नेहरु चौकात असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार शुक्रवारी दुपारी 4़10 वाजेच्या सुमारास सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर शिंदे, गुन्हे शोध पथकातील विष्णु पल्हाड, विलास सोनवणे, औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे संजय काळे हे पाचही कर्मचारी खाजगी वाहनातून (एम़एच़20 डी़ज़े4133) जळगावात दाखल झाल़े तपासचक्रे फिरवित अवघ्या बारा तासात पोलिसांनी चोरीच्या गाडीचा छडा लावला़नियंत्रण कक्षातून प्रतिसाद न मिळाल्याने नाराजीयादरम्यान जळगाव नियंत्रण कक्षाला फोन केला मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पोलीस गाडी घेवून औरंगबादकडे जाण्यासाठी निघाल़े तेवढय़ात शहर पोलीस ठाण्यातील दुष्यंत खैरनार घटनास्थळी आल़े त्यांनी पोलिसांकडून प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला़ शहर पोलीस ठाण्यात येण्याबाबत सांगितल़े यावेळी खैरनार यांच्याजवळ सिल्लोड पोलिसांनी नियंत्रण कक्षातून दोन तास फोनकरूनही प्रतिसाद मिळाल्याची नाराजी व्यक्त केली़ चोरीचे वाहन औरंगाबादच्या दिशेने रवाना केल़े यानंतर शहर पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीत नोंद करत कर्मचारी रवाना झाल़े