भुसावळ : महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे नागपूर येथे झालेल्या १७ व्या सब-ज्युनिअर राज्य अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने यजमान नागपूर संघावर अंतिम सामन्यात चार धावांनी मात करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेत जिल्हा संघाने सलग सहा सामने जिंकले.
नागपूर येथील कलोडे महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात जळगाव संघाने सांगली संघावर ८ गडी राखत मात केली. दुसऱ्या सामन्यात धुळे संघांवर ३० धावांनी विजय मिळवला. तिसरा सामना नागपूर शहर विरुद्ध झाला. या सामन्यात जळगाव संघाने ६ गड्यांनी नागपूरवर मात केली. चौथ्या सामन्यात नागपूर ग्रामीण संघावर ५ गड्यांनी मात केली. पाचव्या उपांत्य सामन्यात अकोल्याला ६ गड्यांनी नमवले तर अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात यजमान नागपूर जिल्हा संघावर जळगाव जिल्हा संघाने ४ धावांनी मात करत अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा आपल्या नावे कोरली. यापूर्वी जळगाव संघाने २०१४- नाशिक, २०१५-अमळनेर, २०१६- मुंबई अशी सलग तीन वर्षे अजिंक्यपद स्पर्धा पटकावली होती. दरम्यान, विजेत्या संघातील खेळाडूंची शिबिरानंतर जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.
जम्मू येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी
विजय संघातील खेळाडूंची अंतिम निवड शिबिरानंतर केली जाणार आहे.
विजय संघाला राज्य संघटनेचे सचिव डॉ. मोहम्मद बाबर, संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. बाबूलाल धोत्रे, उपाध्यक्ष व जिल्हा सचिव वासेफ पटेल, गिरीश पांडव, मनोज जाधव यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
विजेता जळगाव जिल्हा संघ
संघाचे कर्णधार- लोकेश पाटील, आयुष पाटील, कृष्णा महाजन, हर्षवर्धन भोईटे, कौशल भोई, प्रणव चव्हाण, महेश पाटील, गणेश पाटील, हेमराज अहिरराव, अभिजित निनायदे, निरज सोनवणे तसेच
प्रशिक्षक- अरविंद जाधव, व्यवस्थापक विजय पाटील.
जळगाव शहर संघ
प्रेम भावसार, रोहित बिऱ्हाडे, संस्कार सांगोरे, आदित्य पाटील, वैभव सोनवणे, अनिस तडवी, साहिल तडवी, मिरझान तडवी, तन्वीर तडवी, राहुल जाधव, अजिंक्य पाटील, अबुजर पटेल. तसेच प्रशिक्षक साजिद तडवी व व्यवस्थापक तारेक पटेल.
विजय चषक स्वीकारताना. जळगाव जिल्हा संघातील खेळाडू.