शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात 2 लाख हेक्टरवरील पेरण्या वाया जाण्याची भीती

By admin | Updated: June 28, 2017 12:34 IST

पेरण्या 50 टक्क्यांवर जाऊन थांबल्या. सव्वालाख हेक्टरवरील पूर्वहंगामी कापूस सुस्थितीत; बियाण्यांची पुन्हा मागणी

 ऑनलाईन लोकमत 

जळगाव,दि.28 - जिल्हाभरात 50 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. पण पावसाने ओढ दिल्याने तब्बल दोन लाख हेक्टरवरील पेरण्या  वाया जाण्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी व्यवस्थितपणे न अंकुरलेल्या पेरण्या मोडायला सुरुवात झाली आहे. यातच पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्याही थांबल्या आहेत. 
जिल्हाभरात सात लाख 67 हजार हेक्टरवर पेरण्यांचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठरविले होते. जूनच्या सुरुवातीला पेरण्या झाल्या. चोपडा, धरणगाव, जळगावमधील तापीकाठ व गिरणा काठावरील गावांमध्ये धूळ पेरण्याही केल्या. पण पाऊस व्यवस्थितपणे न आल्याने पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. 
सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. सोयाबीन 40 किंवा यापेक्षा अधिक मि.मी. पावसात अंकुरतो, पण अपु:या पावसात सोयाबीन अंकुरलाच नाही. जवळपास 30 हजार हेक्टरवरील सोयाबीन मोडण्याची वेळ आल्याची माहिती आहे. यापाठोपाठ ज्वारी, उडीद, मूग या पिकांची पेरणी वाया गेली आहे. 
एक लाख हेक्टरवरील कोरडवाहू कापूसही कोमेजला
जवळपास एक लाख हेक्टरवरील कापसालाही कमी पावसाचा फटका बसला आहे. 11 जूननंतर अनेक शेतक:यांनी कोरडवाहू क्षेत्रातही कापसाची लागवड केली होती. पण हा कापूस न अंकुरल्याने मोठे आर्थिक नुकसान शेतक:यांना सहन करावे लागले आहे. 
कापूस, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग आदींच्या दोन लाख हेक्टरवरील पेरणीला फटका बसला आहे. तर जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिके सुरक्षित आहेत. अर्थातच जिल्ह्यात चोपडा, जळगाव, यावल, रावेरचा काही भाग, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव व एरंडोलमध्ये पाऊसमान नाही. पण पाचोरा, एरंडोलचा पारोळानजीकचा भाग, पारोळा, अमळनेरचा दक्षिणेकडील अर्धा भाग, चाळीसगावचा काही भाग, जामनेर या तालुक्यांमध्ये स्थिती बरी आहे. अधून मधून आलेल्या हलक्या पावसाने या भागातील पिकांना जीवदान दिले. 
बियाण्याची मोठी उचल सध्या बाजारपेठेत सुरू आहे. पाऊसमान काही भागात बरे आहे. पण काही भागात पाऊसच नाही.  कापूस, उडीद, मूग, सोयाबीन या बियाण्यांची दुबार पेरणीसाठी मागणी वाढल्याने जि.प.च्या कृषी विभागाने अधिकचे बियाणे कृषी आयुक्तालयाकडे मागितले आहे. कापसाचे बियाणे पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्याची कुठलीही टंचाई किंवा अडचण नसल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली.