शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा ग.स. सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अखेर राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 17:33 IST

संचालक मंडळाची बैठक: उमेदवाराबाबत चाचपणी सुरू

ठळक मुद्देराजीनामे सहकारगटाचे नेते बी.बी. पाटील यांच्याकडे सोपविलेअध्यक्ष तुकाराम बोरोले, उपाध्यक्ष महेश पाटील यांचा कार्यकाल संपलानिवडणुकीच्या दिवशी तासभर आधी नावे निश्चित केली जातील

जळगाव- जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.)च्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांची वर्षभराची मुदत आॅक्टोबरमध्येच संपली असल्याने रविवार, दि. १९ रोजी सकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष, व उपाध्यक्षांनी पदांचे राजीनामे  सहकारगटाचे नेते बी.बी. पाटील यांच्याकडे सोपविले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांकडून फिल्डींग लावण्यास प्रारंभ झाला आहे. अध्यक्ष तुकाराम बोरोले, उपाध्यक्ष महेश पाटील यांचा कार्यकाल १ वर्षांचा होता. तो आॅक्टोबरमध्येच संपला होता. मात्र त्यांच्या कार्यकाळातच भुसावळ येथील संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्याचे ठरल्याने त्यांचा कार्यकाळ मुदत संपूनही सुरू ठेवण्यात आला होता. रविवार दि.१९ रोजी या इमारतीचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी सकाळी संचालकमंडळाची बैठक झाली. त्यात अध्यक्ष व उपाध्यक्षांनी राजीनामे सोपविले. ते सोमवार, दि.२० रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सोपविले जाणार आहेत. अध्यक्षपदासाठी सहकार गटाचे गटनेते उदय पाटील, तसेच सुनील निंबा पाटील, सुभाष जाधव आदींची नावे चर्चेत आहेत. ऐनवेळी आणखीही नावे समोर येण्याची शक्यता आहे. मात्र अध्यक्षपदाबाबतचा निर्णय सहकारगटाचे नेते बी.बी. पाटील हेच घेणार आहेत. त्यांना याबाबत विचारणा केली असता डीडीआर निवडणुकीची तारीख जाहीर करतील. त्या निवडणुकीच्या दिवशी तासभर आधी नावे निश्चित केली जातील, असे सांगितले. सध्या सर्व २१ सदस्य सहकार गटात असल्याने विरोधी लोकशाही व लोकमान्य पॅनलकडूनही हालचाली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तिघांची नावे चर्चेतअध्यक्षपदासाठी सहकार गटाचे गटनेते उदय पाटील, तसेच सुनील निंबा पाटील, सुभाष जाधव आदींची नावे चर्चेत आहेत. ऐनवेळी आणखीही नावे समोर येण्याची शक्यता आहे. तर या दोन पदांपैकी एक पद शिक्षक प्रतिनिधीला मिळावे, अशी मागणी काही संचालकांनी केली आहे.