शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा दूध संघाकडून दुधाच्या फॅटच्या दरात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:06 IST

दुधाच्या दरात प्रति लीटर तीन रुपयाने कमी : इतर जिल्ह्यात जळगावपेक्षाही कमी दर

ठळक मुद्देइतर जिल्ह्यात कमी दर पावडर व बटरचे दर कमी झाल्याने हा निर्णय

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 2 -  दुधाच्या फॅटचे दर कमी करण्याचा निर्णय जिल्हा दूध संघाच्यावतीने घेण्यात आला आहे. यामध्ये म्हशीच्या दुधाच्या फॅटचे दर 50 पॉईंटने कमी करण्यात आले  तर गायीच्या दुधाचे दर 25 पॉईंटने कमी करण्यात आले आहे. त्यामुळे दुधाचे दर प्रति लीटर 3 रुपयांनी कमी करण्यात झाले आहे. 1 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, दूध विक्रीचे दर मात्र कमी झालेले नाही. पुरवठा जास्त असला की भाव कमी होतात या तत्वानुसार हे भाव कमी झाल्याचे दिसून येत आहेत. सध्या पावडर व बटरचे दर कमी झाल्याने तसेच दुधाचीही आवक वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता म्हशीच्या दुधाच्या फॅटचे दर 50 पॉईंटने तर गाईच्या दुधाच्या फॅटचे दर प्रति फॅट 25 पॉईंटने कमी करण्यात आले आहे. पूर्वी म्हशीच्या दुधाचे दर 36 रुपये होते ते आता 33 रुपये  तर गायीच्या दुधाचे दर 27 रुपये होते, ते आता 24 रुपये प्रति लीटर करण्यात आले आहे. जवळपास तीन महिने तरी हे दर असेच राहतील, असे सांगण्यात आले. 

इतर जिल्ह्यात कमी दरजळगाव जिल्हा दूध संघाच्यावतीने दिले जात असलेल्या दरांपेक्षाही इतर जिल्ह्यात एक ते दोन रुपये प्रति फॅट दर कमी असल्याचे सांगण्यात आले. 

पावडर व बटरचे दर कमी झाल्याने तसेच दुधाची आवक वाढल्याने फॅटचे दर कमी करण्यात आले आहे. दुधाचे दर तीन रुपये  प्रति लीटरने कमी झाले आहेत. ज्यावेळी दर वाढतात तेव्हा तो फरक दूध उत्पादकांना दिला जातो. - मनोज लिमये, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा दूध संघ.